ETV Bharat / state

माजी शिक्षक आमदार वसंतराव मालधूरे यांचे निधन, शिक्षकी क्षेत्रात हळहळ - Vasantrao Maldhure Death

Vasantrao Maldhure Death : विधान परिषदेचे माजी शिक्षक आमदार वसंतराव पुरुषोत्तम मालधूरे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळामुळे त्यांचे अमरावती शहरातील लक्ष्मी नगर परिसरातील निवासस्थानी रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Vasantrao Maldhure Death
वसंतराव मालधूरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 10:48 PM IST

अमरावती Vasantrao Maldhure Death : वसंतराव पुरुषोत्तम मालधूरे हे मूळचे तिवसा तालुक्यात येणाऱ्या कुऱ्हा या गावचे रहिवासी होते. विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषदेचे ग्रामीण भागातील शाखा कार्यवाह पासून ते सरकार्यवाह पदापर्यंत त्यांनी 1990 पर्यंत कार्य केले. त्यानंतर त्यांना परिषदेने अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची उमेदवारी दिली गेली. या निवडणुकीत ते भरघोस मताधिक्याने निवडून आले.

1990 मध्ये झाले होते आमदार : वसंतराव मालधूरे हे 1990 मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी त्यांनी अमरावती येथील श्री गणेशदास राठी विद्यालयात 40 वर्ष अध्ययन केले ते माध्यमिक शिक्षक परिषदेचे संस्थापक सदस्य होते आणि 1984 मध्ये सरचिटणीस म्हणून निवडले गेले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारी समितीमध्ये ते अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत होते. अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघाची महामंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ते सिनेट सदस्य देखील राहिले. अमरावती नगर वाचनालयाचे ते संचालक होते. याशिवाय अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे संबंध होते.

या कार्यात होते अग्रेसर : आमदारकीच्या कालखंडामध्ये त्यांनी शिक्षकाचे सामूहिक व वैयक्तिक समस्यांचे निराकरण केले. शिक्षक परिषदेचा विस्तार राज्यस्तरावर व्हावा यासाठी त्यांनी स्व. दिवाकर जोशी यांचे सोबत कार्य केले व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सर्व महाराष्ट्रभर उभी झाली. ते 1996 पर्यंत ते आमदार होते. त्याचप्रामाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे ते माजी सिनेट सदस्य, अमरावती नगर वाचनालयाचे संचालक व अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. कार्यकर्ते सांभाळणे, संघटनेशी शिक्षकांना जोडणे हे कसब प्रकर्षाने त्यांचे मध्ये होते. रात्रंदिवस कार्य करणे हा तर त्यांचा व्यासंगच होता. अशा या खंद्या, निष्ठावान ज्येष्ठ मार्गदर्शक अभ्यासु व्यक्तीमत्वाला महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षक समाज मुकला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोमवारी अंत्यसंस्कार : वसंतराव मालधूरे यांची अंत्ययात्रा सोमवारी त्यांच्या लक्ष्मी नगर येथील निवासस्थानावरून सकाळी नऊ वाजता निघणार आहे. हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हे आहेत आप्तस्वकीय : वसंतराव मालधूरे त्यांचे मागे पत्नी, मुलगा विवेक, स्नुषा हर्षा, दोन मुली प्रज्ञा, निवेदिता, जावई प्राचार्य बाळासाहेब दहीकर, सुदेशराव नाचणकर, पार्थ, पुर्वा, डॉ. ऐश्वर्या, शेजल, अवंती, आरती ही नातवंड, बंधू पंडितराव, रामचंद्र. बहिणी असा मोठा विस्तृत परिवार आहे. त्यांचे जाण्याने संघटनेची, समाजाची खूप मोठी हानी झाली आहे. अशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

  1. पदवीधर निवडणुकीसाठी मनसे विरुद्ध भाजपात 'सामना'; अभिजित पानसे Vs निरंजन डावखरेंमध्ये 'टाईट फाईट' - vidhan parishad election 2024
  2. EXCLUSIVE : "...तर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाही धोका दिला असता"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप - CM Eknath Shinde Interview
  3. राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.