ETV Bharat / state

निलेश राणे यांच्या हॉटेलला महापालिकेनं ठोकलं टाळं, तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत

Nilesh Narayan Rane : शिवाजीनगर भागातील डेक्कन परिसरातील आर-डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलला मिळकत कर थकवल्याप्रकरणी पुणे महापालिकेनं टाळं ठोकलं आहे. निलेश राणे यांच्या नावचं हे हॉटेल आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मिळकतीची तीन कोटी रुपयांहून अधिक बाकी थकली होती.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 7:10 PM IST

पत्रकार परिषद

पुणे Nilesh Narayan Rane : माजी खासदार निलेश राणे यांच्या नावावर असलेल्या शिवाजीनगर भागातील डेक्कन परिसरातील आर-डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलला मिळकतकर थकवल्याप्रकरणी पुणे महापालिकेनं टाळं ठोकलं आहे. निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. महापालिकेनं अनेक वेळा नोटीस देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेच्या करसंकलन विभागानं जोरदार कारवाई करून ही मिळकत सील केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मिळकतीची तीन कोटी रुपयांहून अधिक बाकी थकली होती.

रक्कम मागील तीन वर्षांपासून थकली : महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडून मिळकतकर थकबाकी वसुली केली जात आहे. शंभर टक्के करवसुलीसाठी महापालिकेकडून धडक कारवाई केली जात आहे. ही मोहीम राबवताना केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या नव्हे तर राजकीय बड्या व्यक्तींच्या देखील मिळकती सील केल्या जात आहेत. निलेश राणे यांच्यावर मिळकत कराची 3 कोटी 77 लाख 53 हजार 803 रुपये एवढी रक्कम मागील तीन वर्षांपासून थकलेली होती. आता महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

डेक्कन मॉलच्या बाहेर बँड वाजवून आंदोलन : याबाबत महापालिकेचे मिळकत कर प्रमुख महादेव जगताप म्हणाले, की पुणे शहरात जवळपास 5 हजार कोटींची थकबाकी ही वसूल करण्यासारखी आहे. ती वसुल करायला सुरुवात देखील झाली आहे. आत्तापर्यंत 1983 कोटी इतका मिळकत कर वसूल करण्यात आला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत वसुलीचं प्रमाण देखील मोठं आहे. तसंच, जप्तीचं प्रमाण देखील वाढलं आहे. काल देखील डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलवर मिळकतकर थकवल्याप्रकरणी पुणे महापालिकेनं कारवाई केली आहे. ही मिळकत सील करण्यात आली आहे. शहरात आत्ता देखील अशा पद्धतीच्या मिळकती या सील करण्यात येत असल्याचं यावेळी जगताप यांनी सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून आर डेक्कन मॉलच्या बाहेर बँड वाजवून आंदोलन करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

1 समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून IPS ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध न्यायालयात एटीआर दाखल

2 तुम्ही अंगावर आला तर आम्ही शिंगावर घेऊ, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटाला इशारा

3 दिल्लीतून लंडनला विमानाने गेले तब्बल 140 किलो मेफेड्रोन; पुणे पोलिसांच्या तपासात माहिती उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.