ETV Bharat / state

सनदी अधिकारी म्हणून 'टॉप' अन् राजकारणात 'फ्लॉप'; तीन माजी सनदी अधिकाऱ्यांचा राजकीय स्वप्नभंग - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट होताना दिसतोय. यात राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांचा मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळं राजकीय स्वप्नभंग झालाय. (Lok Sabha Nomination) केवळ इच्छा असून चालत नाही तर जनाधार आणि निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची असते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केली आहे.

Praveen Singh Pardeshi
माजी सनदी अधिकारी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 6:08 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राणा जगजीत सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांना धाराशिव मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झालं. (Dharashiv Lok Sabha) मात्र, यामुळे माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचं खासदार होण्याचं स्वप्न भंगलं आहे. केंद्रात आणि राज्यात काम केलेल्या परदेशी यांची चर्चा या मतदार संघांसाठी होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'मित्रा' या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले परदेशी या मतदारसंघातून इच्छूक होते. 1985 च्या बॅचचे सनदी अधिकारी परदेशीं यांनी तत्त्पुर्वी लातूरचे जिल्हाधिकारी, पुणे आणि मुंबईचे आयुक्त आणि मुख्यमंत्र्यंचे सचिव म्हणून काम केलं आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांना केंद्र सरकारमध्ये नियुक्त करण्यात आलं होते.

उमेदवारी मिळाली नाही : परदेशी हे धाराशिवमधून लोकसभेत जाणार अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी 'मित्रा' या संस्थेचा राजीनामाही दिला. धाराशिव येथे खासगी संस्थेमार्फत त्यांनी सर्वेक्षण ही केलं होतं. अधिकारी म्हणून आपली कारकीर्द कशी वाटली? असा प्रश्न नागरिकांना विचारण्यात आला होता. (Praveen Singh Pardeshi) नागरिकांनी त्याला सकारात्मक प्रतिसादही दिला होता. होळीच्या दिवशी बंजारा समाजाबरोबर त्यांनी नृत्य केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. परदेशी हे फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने हा मतदारसंघ भाजपाला सुटेल याची सगळ्यांनाच खात्री होती. मात्र, उमेदवारी प्रवीण परदेशी यांना मिळू शकली नाही. तसंच, अन्य दोन अधिकाऱ्यांनाही संधी मिळाली नाही.

निवृत्तीनंतर दिघावकर यांचा भाजपामध्ये प्रवेश : लोकसभा उमेदवारीसाठी संधी मिळालेली नाही अशा सनदी अधिकाऱ्यांच्या यादीत आणखीन दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये समृद्धी महामार्गामुळे चर्चेत आलेले राधेश्याम मोपालवार हे हिंगोलीमधून इच्छूक होते. 2018 मध्ये निवृत्तीनंतर मोपलवार यांना सात वेळा मुदतवाढ मिळाली होती. समृद्धी महामार्गात मोपलवार यांचं महत्वाचं योगदान आहे. ते एम.एस.आर.डी.सी'चे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या महासंचालकपदी कार्यरत होते. वॉर रूममधून राजीनाम्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. तसंच, माजी पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर हे सुद्धा धुळ्यामधून लोकसभेसाठी इच्छूक होते. 1987 साली पोलीस उपअधीक्षक, 2001 साली आय. पी. एस, पुणे ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक पदी सुद्धा होते. नाशिकमध्ये माजी विशेष पोलीस महानिरीक्षकही होते. निवृत्तीनंतर दिघावकर यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. मात्र, त्यांनाही पक्षाकडून प्रतिसाद भेटला नाही.

सनदी अधिकारी अपक्ष म्हणून रिंगणात : नागपूर, रामटेक मतदार संघातून किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ते काँग्रेसमध्ये आहेत. पण, आपण अपक्ष लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मुक्त चिन्ह प्रेशर कुकर हे त्यांना मिळालं आहे. किशोर गजभिये हे माजी सनदी अधिकारी आहेत. 2010 मध्ये सामाजिक न्याय विभागात सचिव असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर राजकारणात उतरून 2014 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत धुळ्यातून वंचितच्या वतीने माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहेमान यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र, या सनदी अधिकाऱ्यांना खासदारकीपासून वंचित रहावं लागलं. त्यावर बोलताना, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले केवळ इच्छा असून चालत नाही. त्यासाठी जनाधार असावा लागतो. लोकांमध्ये तुमची असलेली प्रतिमा आणि तुम्हाला मिळणारे राजकीय पाठबळ यावरच सर्व अवलंबून असतं. सत्यपाल सिंह यांना भाजपाने तिकीट दिले आणि ते निवडून आले. त्यामुळे तुमची निवडून येण्याची क्षमता हा निकष लावला जातोच, असंही देसाई म्हणाले.

हेही वाचा :

1 खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक - Lok Sabha Elections

2 लोकसभा निवडणूक 2024 : माघार घेतलेले आनंदराज आंबेडकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात - Lok Sabha Election 2024

3 खिचडी घोटाळ्यात संजय राऊत हे मुख्य सूत्रधार, ईडीनं त्यांना अटक करावी-संजय निरुपम - Khichdi scam

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.