ETV Bharat / state

जंगलातून खांब आणून 73 फूट उंचीच्या खांबावर चढवले झेंडे, काय आहे परंपरा? - DASARA 2024

गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या मुहूर्तावर अमरावतीतील एका गावात 73 फुटांच्या दोन खांबावर झेंडा चढवण्याची परंपरा आहे. दरम्यान, यामागचा इतिहास काय? यासंदर्भात आपण जाणून घेऊया.

flags are hoisted on 73 feet high pole on occasion of Dasara in Amravati, traditions of ancient temple at savanga vithoba
दसऱ्याच्या पर्वावर 73 फूट उंचीच्या खांबावर चढवले झेंडे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2024, 1:29 PM IST

अमरावती : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात सावंगा विठोबा गावात कृष्णाजी अवधूत महाराजांच्या मंदिरासमोर हजारो वर्षांपासून उभ्या असणाऱ्या 73 फुटांच्या दोन खांबांवर झेंडे चढविण्यात आले. विशेष म्हणजे इतक्या उंच खांबांवर झेंडे चढवताना झेंडे चढविणाऱ्या व्यक्तीचे पाय या दोन्ही खांबांना लागणार नाही, याची काळजी घेतली जाते. दोन्ही खांबांवरची जुनी खोळ काढून त्यावर नवीन खोळ चढविण्यात येते. हा झेंडे चढविण्याचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

असा आहे इतिहास : यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना विठोबा सावंगा संस्थानचे सचिव अशोक सोनवाल म्हणाले की, "साधारण 400 ते 500 वर्षांपूर्वी कृष्णाजी महाराज हे सावंगा या गावातील उखंडराव चतुर यांच्या घरी वास्तव्यास आले होते. कृष्णाजी महाराज यांच्या अंगी असणाऱ्या दैवी बाबींची जाणीव उखंडराव चतुर यांना झाली. चतुर यांच्या पाच मुलांसोबत कृष्णाजी महाराज हे राहत होते. कृष्णाजी महाराज यांनी त्यावेळी सांगितलेल्या सामाजिक सुधारणाविषयक माहिती उखंडराव चतुर यांचा मुलगा कुणाजी महाराज यांनी गायनास्वरूपात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली. अंधश्रद्धेविरुद्ध असणारा कृष्णाजी महाराज यांचा संदेश भजन स्वरूपात मांडण्यात आला. आज देखील कृष्णाजी महाराज यांचा संदेश देणारी भजन अवधुती भजन म्हणून प्रसिद्ध आहेत. कृष्णाजी महाराज यांनी जाती मुक्त असा नवा संप्रदाय निर्माण केला. या संप्रदायाला चतुरप्रतीय संप्रदाय असं म्हटलं जातं."

दसऱ्याच्या पर्वावर 73 फूट उंचीच्या खांबावर झेंडे चढविण्याची परंपरा (ETV Bharat Reporter)

अवधूत महाराजांचं समाधीस्थान : विठोबा सावंगा या गावात तटबंदी वाड्याच्या आत अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे. या मंदिरात कुठलीही मूर्ति नाही. मात्र, कृष्णाजी महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. या मंदिरात शेकडो वर्षांपासून अखंड ज्योत तेवत आहे. कृष्णाजी महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला डोक्यावर रुमाल बांधावा लागतो किंवा टोपी घालावी लागते. मंदिरात अवधुती भजन सकाळ आणि सायंकाळी गायलं जातं. कृष्णाजी अवधूत महाराज नवसाला पावतात तसंच या ठिकाणी सर्व मनोकामना पूर्ण होते. यासह मानसिक रुग्ण बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

वर्षातून दोन वेळा चढवल्या जातात झेंडे : कृष्णाजी अवधूत महाराज समाधी मंदिरासमोर 73 फूट उंच दोन खांब आहेत. दसरा आणि गुढीपाडव्याच्या पर्वावर या दोन्ही खांबांवर झेंडे चढविले जातात. गत नऊ वर्षांपासून चरणदास कांडलकर हे झेंडे चढवण्याचं कार्य करतात. यावर्षी दसऱ्याच्या पर्वावर नवीन वस्त्र परिधान करून आणि विधिवत पूजा करून चरणदास कांडलकर यांनी नवीन झेंडे चढविलेत. कृष्णाजी महाराज आणि त्यांचे सेवक यांचं प्रतीक हे दोन्ही खांब मानले जातात. दोन्ही खांबावरचे जुने कापड काढणं आणि नवीन चढविण्याची प्रथा सुमारे सातशे वर्षांपासून सुरू आहे. या दोन्ही झेंड्यांना दोरखंड बांधून त्या दोरावरुन चरणदास कांडलकर हे वर चढतात. दोन तासांच्या या चित्त थरारक कसरतीनंतर नवीन खोळ या खांबांवर चढवली जाते.

गडचिरोलीच्या जंगलातून आणले खांब : कृष्णाजी महाराज समाधी मंदिरासमोर असलेले दोन्ही खांब सागवानचे आहेत. आठ वर्षांपूर्वी हे खांब बदलण्यात आले. सध्या मंदिरासमोर जे खांब आहेत ते गडचिरोलीच्या जंगलातून आणण्यात आलेत. हे खांब आता तीन-चार शतकांपर्यंत शाबूत राहतील, असं विठोबा सावंगा मंदिर संस्थेचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे म्हणाले.

झेंडे चढवताना पेटवला कापूर : दसऱ्याच्या पर्वावर दुपारी चार वाजता झेंडे चढविण्याच्या सोहळ्याला सुरुवात होताच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कापूर पेटवण्यात आला. ज्या खांबांवर झेंडे चढविण्यात आले, त्या खांबांना जीवा शिवाची जोडी असं देखील म्हटलं जातं. या दोन्ही खांबाजवळ कापूर पेटवण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. दसऱ्याच्या पर्वावर हजारो किलोचा कापूर भाविकांनी या ठिकाणी पेटवला.

हेही वाचा -

  1. 100 कोटी वर्षांपूर्वीच्या गुहेत 2 हजार वर्षांपासून केली जातेय 'अंबादेवी'ची पूजा; जाणून घ्या पौराणिक कथा
  2. अमरावती जिल्ह्यातील 'या' वाड्यात आली 'जाणता राजा'ची संकल्पना; साहित्यिक आणि राजकीय मंडळींची होती उठबस - historical Wada story
  3. सातपुड्यात 'पांडव कचेरी'; घनदाट जंगलात पुरातत्व खात्यानं जपलाय ऐतिहासिक वारसा - Pandava Kacheri

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.