पुणे Bangladeshi Arrested : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर पुन्हा एकदा कारवाई केलीय. पाच घुसखोर बांगलादेशींना अटक केली असून, त्यांच्याकडं बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला मिळाला आहे. भोसरी येथील शांतीनगरमध्ये शनिवारी ही कारवाई करण्यात आलीय. आज माध्यमांना याची माहिती मिळाली.
याआधीही अशीच घटना घडली होती : पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं शहरात विनापरवाना राहणाऱ्या 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. बुधवार पेठेतील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचं वास्तव्य असलेल्या गल्लीत काही महिला आणि पुरुष बेकायदेशीर पद्धतीनं राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
आतापर्यंत 26 बांग्लादेशी नागरिक ताब्यात : पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या बुधवारपेठेत मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय केला जातो. या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या असतात. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी नागरिकांचं बेकायदेशीररित्या वास्तव वाढलं आहे. पुणे पोलिसांकडून यावर लक्ष देत वेळोवेळी कारवाईदेखील केली जातेय. या महिन्याभरात केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 26 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं आहे.
हेही वाचा -