ETV Bharat / state

लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात! 'राजा'चा पहिला लूक आला समोर; मुकुट ठरतोय चर्चेचा विषय - Ganesh Chaturthi 2024 - GANESH CHATURTHI 2024

Lalbaugcha Raja First Look : मुंबईत ठिकठिकाणी गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश मुर्ती आणल्या जातात. लालबागचा राजाही मंडपात विराजमान झाला असून गणरायाच्या आमगनानं गणेशभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.

First look of Mumbai Lalbaugcha Raja unveiled ahead of Ganesh Chaturthi
मुंबई लालबागचा राजा (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 7:22 PM IST

Updated : Sep 5, 2024, 10:22 PM IST

मुंबई Lalbaugcha Raja First Look : ​मुंबईतील अनेक मंडळातील गणपती बाप्पांचे आगमन सोहळे होऊन, प्रथम दर्शनही झालंय. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचंही गुरुवारी (5 सप्टेंबर) प्रथम दर्शन घडलंय. यावेळी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली.

​मुंबईतील लालबागच्या राजाची पहिली झलक (ANI)

डोळ्याचं पारणं फेडणारं गणरायांचं रूप : दरवर्षी गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात. आज सायंकाळी लालबागच्या राजाची पहिली झलक गणेश भक्तांना पाहायला मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील डोळे दीपतील असं लालबागच्या राजाचं सुंदर रूप पाहायला मिळालं. यंदा लालबाग राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आहे. मरून रंगाच्या वेल्वेटच्या पितांबरमधील राजाचं हे रूप डोळ्याचं पारणं फेडणारं आहे.

मुकुट ठरतोय चर्चेचा विषय : रिलायन्स फाउंडेशननं यंदा लालबागच्या राजाला 16 कोटी रुपये किंमत असलेला मुकुट दान केलाय. हा मुकुट 20 किलोचा असून या मुकुटात पाचू आणि मीना ही रत्ने घडवलेली असून त्याचा घेर सुमारे सहा फुटाचा आहे. रिलायन्स फाउंडेशननं दान केलेला हा मुकुट पाहण्यासाठी सर्व भाविक उत्सुक होते. अखेर आज हा मुकुट सर्वांना बघायला मिळाला.

राजाचा पोशाख मरुन रंगाचा : अगदी पारंपरिक पद्धतीनं राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 91 वं वर्ष आहे. यंदा लालबागच्या राजाचा पोशाख मरुन रंगाचा आहे. या रंगात राजा रुबाबदार आणि देखणा दिसत आहे. पुतळाबाई चाळीमध्ये असलेला लालबागचा राजा किंवा ‘किंग ऑफ लालबाग’ हे मुंबईतील सर्वाधिक भेट दिलं जाणारं गणेश मंडळ आहे. लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे. यंदा लालबाग राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत लाखो भाविक दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात.

हेही वाचा -

  1. गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' यंदा विराजमान होणार 'महाकाल' मंदिरात - Ganesh Galli 2024 Decoration
  2. काय सांगता! एकाच मिनिटात कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनचं तिकीट बुकिंग फुल्ल; चाकरमानी संतप्त - Ganpati Special Trains
  3. कोकणवासियांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाकरिता रेल्वे चालवणार 202 स्पेशल ट्रेन, कधीपासून करता येणार आरक्षण? - Ganpati Special Trains

Last Updated : Sep 5, 2024, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.