पिंपरी (पुणे) CNG Bike Bajaj Freedom : बजाजने लॉन्च केलेली 125 सीसीची ही बाईक 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर धावणारी आहे. बाईकमध्ये २ लिटर पेट्रोल आणि २ किलो सीएनजी बसेल. फक्त सीएनजीवर ही बाईक 204 किलोमीटरचे अंतर कापेल. पेट्रोल आणि सीएनजी मिळून ही बाईक 330 किलोमीटरचा पल्ला कापू शकेल, असा दावा कंपनीनं केला आहे.
'ही' आहेत बाईकची वैशिष्ट्ये : बजाजच्या या सीएनजी बाईकमध्ये पेट्रोल आणि सीएनजीसाठी एकच फ्युएल कॅप कव्हर आहे. या बाईकचे बेसिक मॉडेल हे ९५ हजार रुपयांना आहे तर टॉप व्हेरीएंट मॉडेल १ लाख १० हजार रुपयांना आहे. या दुचाकीचं बुकिंग सध्या चालू झालं असून या दुचाकीचे टॉप व्हेरिएन्ट हे फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या मिळणार आहेत. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही पर्यायांवर धावते. कंपनीच्या दाव्यानुसार, कंपनीने त्यासाठी 11 वेगवेगळ्या टेस्ट केल्या आहेत.
एससीएनजी बाइकमध्ये काय आहे खास : बजाज ऑटोने त्यांच्या या बाईकला कम्युटर सेग्मेंटमध्ये लाँच केले आहे. या बाईकच्या लूक आणि डिझाईनवर टीमने मेहनत घेतली आहे. पहिल्या नजरेतच तुम्हाला प्रश्न पडेल की, सीएनजी सिलेंडर आहे तरी कुठे? ही बाईक पाहिल्यावर तुम्हाला अंदाज पण येणार नाही की, कंपनीने सीएनजी सिलेंडर कुठे ठेवले आहे ते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पण या कमाल डिझाईनचे कौतुक केले आणि बजाज टीमला शुभेच्छा दिल्या.
इतर चांगली वैशिष्ट्ये : जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 मध्ये कंपनीने 125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन बाईकला 9.5PS ची पॉवर आणि 9.7Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये कंपनीने 2 लिटरचे पेट्रोल फ्युएल टँक आणि 2 किलोग्रॅमची सीएनजी टँक दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बाईक फुल टँकमध्ये (पेट्रोल+सीएनजी) 300 किमी पेक्षा जास्त अंतर कापते.
या 7 रंगांमध्ये बाईक उपलब्ध : बजाजची ही बाईक तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. Bajaj Freedom 125 बाईक डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक या दोन ब्रेकिंग सिस्टिमसह येते. ही बाईक एकूण 7 रंगामध्ये येईल. यामध्ये कॅरेबियन ब्लू, इबोनी ब्लॅक ग्रे, प्यूटर ग्रे ब्लॅक, रेसिंड रेड, सायबर व्हाईट, प्यूटर ग्रे येलो, इबोनी ब्लॅक रेड रंगाचा यामध्ये समावेश आहे.
हेही वाचा: