ETV Bharat / state

अमरावतीत टायरच्या गोदामाला भीषण आग; धुरामुळं परिसरात भीतीचं वातावरण - Fire Breaks Out in Amravati - FIRE BREAKS OUT IN AMRAVATI

Fire Breaks Out in Amravati : अमरावती शहरातील जुन्या टायरच्या गोदामाला भीषण आग (Fire News) लागल्यानं खळबळ उडाली आहे. आगीत टायर आणि भंगार साहित्य जळून खाक झाले असून धुरामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.

Fire Breaks Out in Amravati
भीषण आग (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 10:01 PM IST

अमरावती Fire Breaks Out in Amravati: अमरावती शहरातील वलगाव मार्गावर असणाऱ्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात जुन्या टायरच्या गोदामाला शनिवारी भीषण आग (Fire News) लागली. या आगीत गॅस कटरसाठी उपयोगी पडणारे काही सिलेंडर फुटले आहेत. यामुळं मोठा आवाज झाल्यानं संपूर्ण परिसर हादरला आहे. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या 20 ते 25 पाणाच्या बंबांनी ती विझवण्यात आली. चार तासाच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली असली तरी, या आगीमुळं झालेल्या प्रचंड धुराने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

टायरच्या गोदामाला भीषण आग (ETV BHARAT Reporter)

भीषण आगीमुळं हादरला परिसर : शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास जावेद मंसूरी यांच्या मालकीच्या टायर आणि स्क्रॅपच्या गोदामाला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची वाहने वालकट कंपाउंड आणि बडनेरा येथून घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे बंब पोहोचेपर्यंत ह्या आगीनं रौद्र स्वरूप धारण केलं होतं. अतिशय गर्दीच्या आणि अडचणीच्या परिसरात असणाऱ्या जुन्या टायर गोदामाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. टायरचा धूर चार ते पाच किलोमीटरपर्यंत हवेत पसरला होता. ही आग लागल्यामुळं या परिसरातील वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला होता. गोदामामध्ये असणारे जुने टायर, भंगार साहित्य जळून खाक झाले आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं.

सिलिंडरच्या स्फोटामुळं हादरला परिसर : आगीमुळं टायर आणि भंगार साहित्य जळाले आहे. रिमझिम पाऊस सुरू असताना देखील टायरच्या गोदामाला लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. या गोदामाच्या चारही बाजूने अग्निशमन दलाने पाण्याचा मारा केला. पोलीस उपायुक्त सागर पाटील घटनास्थळी दाखल झाले असून आगीमुळं घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.

हेही वाचा -

मुंबईत कनकिया समर्पण टॉवरच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग; वृद्धाचा मृत्यू, 3 जखमी - Fire Breaks Out in Borivali

कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 49 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये बहुतांश भारतीय असण्याची भीती - Kuwait Building Fire

डोंबिवली एमआडीसी मधील दोन कंपनीत भीषण आग; जीवितहानी नाही, कंपन्यांचं मोठं नुकसान - Dombivli MIDC Fire

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.