सिंधुदुर्ग Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला पुतळा पडल्यानं नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. हा पुतळा पडल्याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109,110,125,318 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
Correction | Indian Navy notes with deep concern the damage caused this morning to the statue of Chhatrapati Shivaji Maharaj that was unveiled on Navy Day on December 4*, 2023, as a dedication to the citizens of Sindhudurg. Along with the State Government and concerned…
— ANI (@ANI) August 26, 2024
भारतीय नौदलानं स्थापन केली चौकशी समिती : राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर भारतीय नौदलानं तत्काळ या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. भारतीय नौदलानं याबाबतची माहित दिली आहे. भारतीय नौदलाच्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. मात्र पुतळ्याला हानी झाल्यानं नौदल चिंतेत आहे. या प्रकरणी राज्य सरकार आणि तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. हा पुतळा तत्काळ पुनर्स्थापित करण्यासाठी पावलं उचलण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय नौदलानं समिती स्थापन केली आहे, अशी माहिती भारतीय नौदलानं दिली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj statue incident: FIR filed against contractor, structural consultant in Sindhudurg
— ANI Digital (@ani_digital) August 26, 2024
Read @ANI Story | https://t.co/U1TVsBHEye#chhatrapatishivajimaharajstatue #Sindhudurg #Maharashtra pic.twitter.com/Ua2LgrR6Os
छत्रपती शिवरायांचा 100 फूट पुतळा उभारणार : मालवण इथं असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेलं होतं. 35 फुटाचा असलेला हा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींचा मोठा संताप झाला आहे. पुतळा कोसळल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मालवण इथं भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटी पुतळा कोसळला आहे. त्या पुतळ्याच्या जागी छत्रपती शिवरायांचा 100 फुटी पुतळा लवकरच बसवण्यात येईल, अशी घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करणारे पहिले राजे होते. त्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिलं नौदल स्थापन केलं होतं. अशा राजांचा पुतळा कोसळणं ही घटना अतिशय दुःखद आहे. इथला पुतळा 28 फूट उंच होता, मात्र लोकांनी 100 फुटांचा पुतळा बनवावा, अशी मागणी केली. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी बोलेन, आम्ही अंदाजपत्रक तयार करु. हीच शिवाजी महाराजांना मानवंदना असेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
निलेश राणेंनी व्यक्त केला संताप : छत्रपती शिवरायांचा मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानं राज्यभरातील शिवप्रेमी संतापले आहेत. घटनेची माहिती मिळताच निलेश राणे यांनी मालवण इथं धाव घेतली. यावेळी त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं निलेश राणे यांनी मोठा संताप व्यक्त केला.
हेही वाचा :