मुंबई Financial Fraud With Woman: ऋषी पांडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानं बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये गुरुजी असल्यानं पोलीस अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असल्याचं भासवून महिलेकडून लाखो रुपये उकळले. (accused arrested in Surat) या प्रकरणी गुन्हा २०१९ साली दाखल केला होता. याप्रकरणी शुक्रवारी बोरिवली पोलिसांनी अयोध्येला जाण्याआधी या आरोपीला अटक केली असल्याची माहिती बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी दिली आहे.
आरोपीला गुजरातमधून अटक: माझी पोलिसात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असल्याचं सांगत आरोपीनं महिलेला मदत करण्याची बतावणी करून २ लाख ४० हजार रुपये लुबाडले होते. आरोपी ऋषी पांडे याने मथुरा, गुजरात, सोमनाथ, उज्जैन अशा अनेक मंदिरांना भेटी दिल्या असून देवदर्शनानंतर तो अयोध्येला जाण्याच्या तयारीत होता. बोरिवली पोलिसांनी आरोपीला गुजरातमधून अटक केली आहे. बोरिवली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या भोंदू बाबानं अनेकांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तपासात सहकार्य नसल्यानं पोलीस मागावर: आरोपीनं २०१९ साली एका महिलेला तिच्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याची बतावणी करून २ लाख ४० हजार रक्कम घेतली. आरोपीनं तक्रारदार महिलेला कुठल्या प्रकारे मदत केली नाही. आरोपी गुरुजी ऋषी पांडे याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार बोरिवली पोलीस ठाण्यात दाखल होती. या तक्रारीच्या अनुषंगानं आरोपी गुरुजी असलेल्या ऋषी पांडेला नोटीस देखील देण्यात आली होती. मात्र, तो तपासात सहकार्य करत नसल्यानं तपास पथक त्याच्या मागावर होते.
आरोपीला सुरतहून अटक: पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ऋषी पांडे उज्जैन आणि गुजरात या राज्यात फिरत होता. तांत्रिक तपास करून आरोपी ऋषी पांडेला सुरतहून अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा: