ETV Bharat / state

सिमकांडचा पर्दाफाश! भलत्याच्याच नावावर 3 हजार सिमकार्डची खरेदी करून नागरिकांची आर्थिक फसवणूक, तिघांना अटक - SIM Cards Fraud Exposed - SIM CARDS FRAUD EXPOSED

SIM Cards Fraud Exposed : सिमकार्ड विक्री करणाऱ्या एजंटच्या माध्यमातून दुसऱ्याच्या नावाने सिमकार्ड घेऊन सायबर गुन्हेगारांकडून त्याची परराज्यात आणि विदेशात विक्री केली गेली. अशा एका आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना ठाण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. त्यांच्याकडून डिऍक्टीव्हेटेड ७७९ मोबाईल सिमकार्ड, मोबाईल हॅन्डसेट्स आणि डेबिट, क्रेडिट कार्डसह इतर साहित्य जप्त करण्यात आलय. आरोपींनी आतापर्यंत 3 हजार सिमचा गैरवापर केल्याची कबुली दिलीय.

SIM Cards Fraud Exposed
सिमकांड प्रकरणात जप्त करण्यात आलेले साहित्य दाखविताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 8:49 PM IST

ठाणे SIM Cards Fraud Exposed : विविध मोबाईल कंपनीच्या सिमकार्ड विक्री करणाऱ्या एजंटच्या माध्यमातून दुसऱ्याच्या नावाचे सिमकार्ड घेऊन परराज्यात, विदेशात वापर करून बनावट शेअर ट्रेडिंग ऍप्लिकेशन साईट्सवरून आर्थिक गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा - सायबर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठं यश लाभलं आहे. या कारवाईत सिमकार्डचा वापर करीत परराज्यातून आणि विदेशातून हा काळा धंदा चालवीत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सायबर, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक : चितळसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे रजिस्टरमध्ये दाखल गुन्ह्यात अज्ञात आरोपींनी मोबाईलवर तक्रारदार यांना एक लिंक पाठवून शेअर गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याचं आमिष दाखवून विश्वास संपादन करत २९ लाख ३० हजाराचा गंडा घालण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात "सिमकार्ड कांड"चा पर्दाफाश झाला. तपासात मोबाईल क्रमांक ज्या इन्सेटमध्ये वापरात आला त्याच्या आयएमईआयचे तांत्रिक विश्लेषण केले. सदर मोबाईल हँडसेट सद्यस्थितीत न्यू शांतीनगर जिल्हा रायपूर, राज्य छत्तीसगड येथे वापरात असल्याचे निष्पन्न झाले.

तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीला अटक : अज्ञात आरोपीची कोणतीही स्पष्ट ओळख निष्पन्न होत नसताना केवळ आयएमईआय लोकेशन ट्रेस करून तंत्रज्ञानाचा वापर करून सपोनि. मंगलसिंग चक्षाण, सपोनि. प्रदीप सरफरे, पोउपनि. सुभाष साळवी, सायबर सेलचे पथक पोना/प्रविण इंगळे, राजेंद्र नेगी, गणेश इलग यांनी आरोपीतांचे गुन्हेगारी स्थळ शोधून छापेमारीची यशस्वी कारवाई केली. छापेमारीत आरोपी अफताय इरशाद देबर( वय २२ वर्षे, रा. जगदलपूर, राज्य छत्तीसगड), आरोपी मनिषकुमार मोहित देशमुख ( वय २७ वर्षे, रा. आर्यनगर, छत्तीसगड) आणि टोळ्यांना सिमकार्ड पुरवणारा भाईजान उर्फ हाफीज लईक अहमद ( वय ४८ वर्षे, रा. उत्तर पूर्व दिल्ली) यांना १६ जुलै रोजी ११ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात नेले असता १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे.

फसवणुकीच्या धंद्यात वापरातील मुद्देमाल हस्तगत : न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावल्यानंतर पोलीस पथकानं चौकशीत आरोपींकडून त्यांच्या ताब्यातून डिऍक्टीव्हेट ७७९ मोबाईल सिमकार्ड, १ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर, २३ मोबाईल हॅन्डसेट्स, ५० डेबिट, क्रेडिट कार्ड, २० चेकबुक, पासबुक, रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मोबाईल सिमकार्ड, बॅंक चेकबुक, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे संबंधित बॅंक खात्यांचे विश्लेषणात्मक तपास केला. सुमारे ५ ते ६ बॅंक खात्यांच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे तपासत आढळले.

विविध राज्यात १४ फसवणुकीच्या तक्रारी : पोलिसांनी केलेल्या छापेमारीत पोलिसांनी हस्तगत केलेल्या सिमकार्डमधून अनेक बँकांशी व्यवहार झाल्याचे समोर आले. तर दुसरीकडे राजस्थान, हरियाणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, वेलंगणा, गुजरात, केरळ इत्यादी राज्यात पोलीस ठाण्यामध्ये १४ तक्रारी दाखल असल्याचे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवरील अभिलेखावर नमूद असल्याचं उपायुक्त मणेरे यांनी सांगितलं. या टोळीत अनेकांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

देश, विदेशात सिमकार्डचा गैरवापर : अटक आरोपींकडून हस्तगत केलेल्या सिम व्यतिरिक्त त्यांनी गुन्ह्यात वापर केलेले सिमकार्ड हे आरोपींनी रायपूर, वित्यसपूर आणि दिल्ली या राज्यातून वापर केल्याचं तपासात निष्पन्न झालं. तर विदेशात सिमकार्डचा वापर कंबोडिया, दुबई, चीन इतर परदेशात सायबर गुह्यांकरिता पुरविले असल्याचे तपासात दिसून येत आहे. यापूर्वी एकूण ३००० सिमकार्ड अशा फसवुणकीच्या गुन्ह्यांमध्ये वापरली असल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती उपायुक्त मणेरे यांनी दिली. सायबर गुन्हेगार हे दोन प्रकारे गुन्हे करतात. विविध आयडिया लावून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तुमचे पार्सल आले, लिंक पाठविणे, घाबरविणे आणि दुसरे नफ्याचे अमिश दाखवून फसवितात. तेव्हा नागरिकांनी अशा कुठल्याही अमिषाला बळी पडू नये. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, आपले ओटीपी कुणालाही शेअर करू नये, असं आवाहन नागरिकांना आहे.

हेही वाचा :

  1. तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर तर होत नाही? 441 बनावट सिमकार्ड विकणाऱ्या गुजरातच्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक - Mumbai Crime News
  2. Sim Card Fraud Case: बनावट कॉल सेंटरसाठी 99 बनावट सिमकार्ड केले अ‍ॅक्टिव्हेट; एकास अटक
  3. दहशतवाद्यांकडून बनावट आरसी आणि सीमकार्ड जप्त; तर हवालाशी सबंध असल्याचा पोलिसांचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.