ETV Bharat / state

विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा आहे? 'या' दिवशी करा राशीनुसार अर्ज, पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होत आहे. तर राशींच्या अनुषंगानं अर्ज कधी करावा याबाबत आपण माहिती पाहणार आहोत.

Maharashtra Assembly Election 2024
राशीनुसार दाखल करा अर्ज (File Photo Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2024, 5:39 PM IST

Updated : Oct 21, 2024, 6:23 PM IST

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आली की, अनेक नेतेमंडळी कुंडलीच्या आधारावर आपली राजकीय गणितं आखण्यास सुरुवात करतात. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तसाच अनुभव येत असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राशींच्या अनुषंगानं अर्ज कधी करावा याबाबत माहिती दिली. पक्ष-उमेदवार कार्यालय कधी सुरू करावं, अर्ज भरणं कोणत्या दिवशी लाभदायी राहील याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवस अनेक उमेदवारांनी ज्योतिष आणि पुरोहितांची वेळ आरक्षित करून ठेवल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 'ई टीव्ही भारत' अंधश्रद्धेच्या विरोधात असली तरी ज्योतिष्यावर विश्वास असणाऱ्या वाचकांसाठी हा वृत्तांत.

प्रतिक्रिया देताना ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी (ETV Bharat)

उमेदवारांसाठी कोणता दिवस असू शकतो चांगला? : निवडणुकीत अनेक उमेदवार देवाचा धावा करतात. ज्योतिषाकडं राजकीय कारकीर्द नशिबी आहे का? याचा वेध घेतात. आपल्या राशीनुसार चांगला दिवस कोणता याबाबत इच्छुक उमेदवार ज्योतिषाचार्य यांच्याकडं विचारणा करतात. त्यानुसार संभाजीनगर येथील ज्योतिषाचार्य वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांनी राशी नुसार चांगले दिवस सुचवले आहेत.

  • मिथुन, सिंह आणि कुंभ या राशींसाठी २२ आणि २३ ऑक्टोबर
  • कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींसाठी २४ आणि २५ ऑक्टोबर
  • सिंह, तुळ, मेष आणि धनु या राशींसाठी २६ आणि २७ ऑक्टोबर
  • कन्या, वृषभ, वृश्चिक आणि मकर या राशींसाठी २८ आणि २९ ऑक्टोबर हे लाभदायी असणार आहेत.

सर्वांसाठी चांगला दिवस : आता इच्छुक उमेदवारांनी ठराविक दिवशी अर्ज केल्यास इच्छापूर्ती होण्याची शक्यता असते. तर २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग असल्यानं हा दिवस सर्वांसाठी चांगला आहे. या दिवशी प्रचार कार्यालय सुरू करू शकतात असं पांडव गुरुजी यांनी सांगितलं.

उमेदवार निवडतात विशिष्ट दिवस : धार्मिक असलेला प्रत्येक राजकीय नेता आपला अर्ज भरण्यासाठी विशिष्ठ दिवस निवडतो, त्याचा प्रत्यय प्रत्येकवेळी येतोच. त्यासाठी उमेदवार आपला विश्वास असलेल्या ज्योतिष किंवा गुरुजींच्या संपर्कात असतात. राशीच्या अनुषंगानं दिवस आणि वेळ पाहून पुढील रणनीती, प्रचाराला सुरुवात होते. निवडणूक लागताच यासाठी अनेक उमेदवार ज्योतिषांच्या संपर्कात राहतात. मतदान होईपर्यंत काही उमेदवार रोज पूजा करण्यासाठी गुरुजींना आरक्षित करतात. कोणी प्रचार कार्यालयासमोर गाय बांधते, तर कोणी इतर काही धार्मिक उपाययोजना करतात असं देखील अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितलं.

'ई टीव्ही'ची भूमिका : धार्मिक असलेल्या व्यक्ती श्रद्धा म्हणून काही बाबी करतात. मात्र, त्याला देखील काही मर्यादा असतात. 'ई टीव्ही भारत' कधीही अंधश्रध्दा मानत नाही. मुहूर्तावर अर्ज भरून नाही तर मिळालेल्या संधीचं सोनं करत मतदारांचे प्रश्न सोडवले, तर यश मिळू शकतं असं आम्हाला वाटतं.

हेही वाचा -

  1. महायुतीमधल्या वाशिमच्या संभाव्य उमेदवारांचं भविष्य टांगणीला, आता इच्छुकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा
  2. " जागावाटप उद्या होणार, महाविकास आघाडीपेक्षा महायुती..."-नाना पटोले
  3. उमेदवारांच्या यादीत डावलल्यानं भाजपा नेते श्रीनाथ भिमाले नाराज, कोणती भूमिका घेणार?

Last Updated : Oct 21, 2024, 6:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.