ETV Bharat / state

मद्यधुंद अवस्थेतील रुग्णाकडून महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईच्या 'या' रुग्णालयातील घटना - Female Doctor Assaulted By Patient

Female Doctor Assaulted By Patient : मद्यधुंद अवस्थेतील एका रुग्णानं महिला डॉक्टरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. मुंबईतील सायन रुग्णालयात हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Female Doctor Assaulted By Drunk Patient
संग्रहित छायाचित्र (Source : ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 1:56 PM IST

Updated : Aug 18, 2024, 2:12 PM IST

मुंबई Female Doctor Assaulted By Patient : नुकतंच कोलकातातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. या घटनेमुळं देश हादरला असताना आता मुंबईतसुद्धा एका मद्यधुंद अवस्थेतील रुग्णानं महिला डॉक्टरला मारहाण केली. ही धक्कादायक घटना मुंबईतील लोकमान्य टिळक अर्थात पालिकेच्या सायन रुग्णालयात घडली. या घटनेनंतर डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.

नेमकं काय घडलं? : रविवारी पहाटे एक रुग्ण मद्यधुंद आणि जखमी अवस्थेत रुग्णालयात आला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावर आधीच डॉक्टरांनी टाके घातले होते आणि कापसाचे बोळे दिसत होते. यावेळी त्याच्यासोबत सात ते आठ नातेवाईक देखील होते. आपल्याला उपचाराची गरज असल्याची मागणी संबंधित रुग्णानं महिला डॉक्टराकडं केली.

रुग्ण आणि नातेवाईक झाले फरार : रुग्ण हा महिला डॉक्टरशी बोलत असताना त्यानं मध्येच मोठ्यानं बोलत शिवीगाळ केली. तसंच कापसाचे रक्ताने माखलेले बोळे महिला डॉक्टरच्या अंगावर फेकले. धक्काबुक्कीही केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं महिला डॉक्टरच्या लक्षात येताच, त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावलं. तोपर्यंत रुग्ण आणि त्याच्यासोबत असणाऱया नातेवाईकांनी पळ काढला, अशी माहिती 'मार्ड'चे डॉक्टर अक्षय मोरे यांनी दिली. परंतु या घटनेनंतर महिला डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांनी सुरक्षेची मागणी केली. दरम्यान, वरील सर्व माहिती ही 'मार्ड'चे डॉक्टर अक्षय मोरे यांनी दिली.

गुन्हा दाखल : या धक्कादायक घटनेनंतर 'मार्ड'च्या डॉक्टरांनी याबाबत सायन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. "याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. वारंवार मारहाणीच्या घटना घडतायेत. काही दिवसांपूर्वी रात्री दोन वाजता मार्डच्या एका डॉक्टराचा काही रुग्णांनी पाठलाग केला होता. यानंतर आता अशी घटना घडल्यामुळं आमच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, अधिक सुरक्षा देण्यात यावी. तसंच ही सुरक्षा हल्ले रोखण्यास सक्षम असावी किंवा असा काही प्रकार घडल्यास तांत्रिक सिस्टम बसवावी जेणेकरुन असे हल्ले रोखण्यात येतील," अशी मागणी 'मार्ड'चे डॉक्टर प्रवीण ढगे यांनी केली. या घटनेनंतर त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा -

  1. केंद्रानं घेतली डॉक्टर संघटना संपाची दखल; कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल प्रत्येक दोन तासाला द्या - गृह मंत्रालय - Kolkata Doctor Rape Murder Case
  2. कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर येथील डॉक्टरांचा कँडल मार्च - Kolkata doctor Rape Case
  3. पुण्यात 20 हजार डॉक्टर संपावर, आरोग्यसेवा कोलमडली - Doctors strike in Pune

Last Updated : Aug 18, 2024, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.