ETV Bharat / state

महायुतीमधल्या वाशिमच्या संभाव्य उमेदवारांचं भविष्य टांगणीला, आता इच्छुकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

वाशिममध्ये आता महायुतीच्या इच्छुकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या यादीत जिल्ह्यातील एकही उमेदवार जाहीर न झाल्यानं अनेकांची धाकधूक वाढली आहे.

अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे
अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2024, 3:31 PM IST

वाशिम : भाजपा पक्षानं ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात वाशिम जिल्ह्यातील एकाही उमेदवाराचं नाव नसल्यानं इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. वाशिममधून तीन टर्म आमदार राहिलेल्या लखन मलिक यांचंही पहिल्या यादीत नाव नसल्यानं येथे भाजपा नवीन चेहरा देणार की पुन्हा एकदा त्यांनाच संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपाचे नेते संजय कुटे हे रविवारी वाशिम येथे आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानं सस्पेन्स वाढला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपानं ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपानं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र भाजपाचे चारवेळा आमदार राहिलेल्या उमेदवाराचं या यादीत नाव नाही. त्यामुळे त्यांच्या जागेवर नवा उमेदवार भाजपा देणार असल्याची चर्चा वाशिम शहरात रंगू लागली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानं आमदार लखन मलिक म्हणाले की, पक्षानं मला चार वेळा संधी दिली. आणखी एकदा संधी द्यावी, अशी माझी पक्षाला विनंती आहे. पक्ष जो आदेश देईल, त्या पद्धतीनं मी काम करेन, असंही ते म्हणाले.

सध्या भाजपाची पहिली यादी जाहीर झाली आहे. दुसरी यादी येत्या दोन-तीन दिवसात जाहीर होईल. त्या यादीमध्ये कुणाचं नाव जाहीर होणार हे पाहणं औत्सुक्याचं राहील. निवडणूक जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील कोणती जागा कुणाला सुटेल यावरून चढाओढ दिसून येत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटानंही कंबर कसली आहे. त्यामुळं जागेचा तिढा सोडवताना महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. पहिल्या यादीत जिल्ह्यातील एकाही उमेदवाराचा समावेश नसल्यानं इच्छुक अस्वस्थ असले तरी शिंदे गट आणि अजित पवार गटातील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

हेही वाचा..

  1. विधानसभा निवडणूक २०२४ : वाशिमच्या तीनही मतदार संघात चुरस; कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.