ETV Bharat / state

सर्वांत चर्चेत असलेल्या 'या' लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्याची आत्महत्या, 'हे' कारण आले समोर - Farmer Suicide Video Viral

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 8:05 PM IST

Farmer Suicide Case : प्रशासनाच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील लाटे या गावात घडली आहे. असं करण्यापूर्वी त्या शेतकऱ्याने त्याची व्यथा मांडणारा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला. जाणून घ्या सविस्तर माहिती...

Farmer Suicide Case
आत्महत्या

पुणे (बारामती) Farmer Suicide Case : बारामती तालुक्यातील लाटे येथे शेतकऱ्याने पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांना कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून त्यामध्ये सर्व हकिकत सांगितली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वायरल होत आहे.

शेतमालकाला दमदाटी : हनुमंत सणस असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये सणस यांचे क्षेत्र आहे. सणस यांच्या रानामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युत पंप बसवलेले असताना त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले. सणस यांचे रान मोकळे केले. त्यानंतर हनुमंत सणस आणि त्यांचा भाऊ त्या रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करून, अशी धमकी देखील काही लोकांनी दिली. त्यानंतर वारंवार पोलीस स्टेशन मधून हनुमंत सणस आणि त्यांचे बंधू यांना फोन येऊ लागले. याला भिऊन हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे, असं जयवंत सणस यांनी सांगितलं आहे.

विदर्भात 230 शेतकऱ्यांची आत्महत्या : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबताना दिसत नाही. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी आपण अनेक उपाययोजना केल्याचा दावा केला असला, तरी जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 या दोन महिन्यात राज्यात 427 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भात सर्वाधिक 230 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली.

काय आहे शेतकरी संघटनांचं म्हणणं? : महाराष्ट्र हे पुरोगामी आणि कल्याणकारी राज्य आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणारे राज्य आहे, अशी राज्याची प्रतिमा आहे. मात्र, असं असलं तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबताना दिसत नाही. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीसह पीक विमा आणि अन्य योजनांपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही शाश्वत उपाययोजना नसून वरवरच्या मलमपट्टीनं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे.

महाराष्ट्रात दोन महिन्यात 427 शेतकऱ्यांच्या आत्महत्या : जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलं. यामध्ये विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. पश्चिम विदर्भात 175 शेतकऱ्यांनी, पूर्व विदर्भात 54 शेतकऱ्यांनी आणि मराठवाड्यात 146 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अमरावती महसूल विभागात अमरावती जिल्ह्यात 48, अकोला जिल्ह्यात 33, यवतमाळ जिल्ह्यात 48, बुलढाणा जिल्ह्यात 34 आणि वाशिम जिल्ह्यात बारा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी असल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. माढा, बारामतीनंतर सोलापूरचा वाद फडणवीस यांच्या दरबारी, तासाभराच्या चर्चेनंतर उत्तम जानकर परतले - Uttam Jankar met Fadnavis
  2. सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबारात वापरलेली दुचाकी रायगडमधील, तर सुपारी 'या' कुख्यात गुंडानं घेतल्याचं उघड - Salman Khan Firing Case
  3. तुतारीच्या उमेदवारानं मुतारीचा केला घोटाळा; भाऊ नेमकं प्रकरण काय हाय रं? - APMC toilet scam

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.