ETV Bharat / state

शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या 'क्षितीज'चा मनोरंजन जगतात होता दबदबा - Kshitij Zarapkar passed away - KSHITIJ ZARAPKAR PASSED AWAY

Kshitij Zarapkar passed away : आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक-लेखक क्षितीज झारापकर यांचं निधन झालंय. सुंदरा मनामध्ये भरली या नाटकाच्या टीम बरोबर शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेले क्षितीजनं भारतात आल्यानंर मनोरंजन क्षेत्रात मोठ नाव कमावलं होतं.

Kshitij Zarapkar passed away
Kshitij Zarapkar passed away (Etv Bharat Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 4:43 PM IST

Updated : May 5, 2024, 5:01 PM IST

मुंबई Kshitij Zarapkar passed away : मराठी मनोरंजन विश्वातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते-दिग्दर्शक-लेखक अशा तिहेरी भूमिका चतुराईनं साकारणारे क्षितीज झारापकर यांचं निधन झालं आहे. क्षितीज झारापकर यांनी वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. आज (५ मे) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून क्षितीज झारपकर कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची या आजाराशी झुंज अखेर संपली आहे.

मनोरंजन जगतात झारापकरांचा दबदबा : 'टूर टूर', 'काला वजीर पांढरा राजा', 'सुंदरा मनानं भरली', 'सख्खे शिशिदी', 'ईच्छा माझी पुरी करा' या एकांकिकांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'लखात मी देखनी', 'सख्या सजना' या नाटकांच्या लेखन, दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अलीकडेच ते अस्ताद काळे तसंच अदिती सारंगधर यांच्यासोबत 'चार तर मीच' या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

'या' चित्रपटात केलं काम : क्षितीज झारापकर हे मराठी मनोरंजन विश्वातील खूप मोठं नाव होतं. आतापर्यंत 'गोळा बेरीज', 'एकुलती एक', 'आयडियाची कल्पना' ‘बालगंधर्व’, ‘बायकोच्या नकळत’ ‘ठेंगा’, यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार अभिनय केलाय. तसंच त्यांनी ‘आभाळमाया’, ‘दामिनी’, ‘बेधुंद मनाची लहर’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकांमध्येही काम केलंय. त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. केवळ अभिनेता म्हणून नाही तर, चित्रपट, नाटकांचे दिग्दर्शक, लेखक म्हणूनही त्यांचा परिचय आहे. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन, लेखन क्षेत्रातही लक्षणीय कामगिरी केली.

हे वाचलंत का :

  1. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहाबरोबर अयान मुखर्जी झाला स्पॉट - ayan mukerji spotted with raha
  2. रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख यांचा मजेदार रिल व्हायरल, पाहा व्हिडिओ - Riteish Genelia Deshmukh
  3. वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपटाचं शूटिंग सुरू - Sunny Sanskari Ki Tulsi Kumari

Last Updated : May 5, 2024, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.