ETV Bharat / state

फलटणमधील हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळली ४ लाखांची खंडणी, महिलेसह सात जणांना अटक - Honeytrap Satara

Honeytrap Satara : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सध्या क्राईम रेट भलताच वाढला असून हनीट्रॅपसारख्या घटना देखील उघडकीस येत आहेत. अशाच एका प्रकरणात फलटण पोलिसांनी एका महिलेसह सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने फलटणसह लोणंद परिसरात आणखी गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Honeytrap Case Satara
अटक केलेले आरोपी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 10:21 PM IST

सातारा Honeytrap Satara : फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून अपहरण करत ४ लाखांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेसह सात जणांना पोलिसांनी गजाआड केलं आहे. या टोळीने फलटण, लोणंद परिसरात आणखी गुन्हे केले असल्याचा पोलिसांना संशय आहे.

हॉटेल व्यावसायिकाला केली मारहाण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा फलटणमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. गेल्या चार महिन्यांपासून एक महिला जेवणाचे पार्सल नेण्यासाठी हॉटेलमध्ये येत होती. महिलेशी ओळख झाल्यानंतर ३० ऑगस्ट रोजी त्यांनी मोटरसायकलवरून लोणंद, वीर धरण या ठिकाणी फेरफटका मारला. लॉज न मिळाल्याने परत येत असताना दोघांनी त्यांना अडवले. आमच्या बहिणीला घेऊन कुठे घेऊन फिरत आहेस, असं म्हणत मारहाण केली.

बलात्काराच्या केसची दिली धमकी : हॉटेल व्यावसायिकाला मारहाण होत असताना संशयित महिला तिथून निघून गेली. त्यानंतर तिघांनी व्यावसायिकाला बलात्काराची केस दाखल करणार असल्याची धमकी दिली. त्याच्याकडून बळजबरीने फोन पे द्वारे २६ हजार रुपये घेतले. आणखी ४ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. पैसे घेऊन आला नाहीस तर नग्न फोटो आणि बलात्कार केल्याबाबत वदवून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.

महिलेच्या चौकशीत संशयितांची नावे निष्पन्न : पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या कटातील अन्य संशयितांची नावे तिने सांगितली. त्यावरून उमेश संजय खोमणे (रा. खराडेवाडी, ता. फलटण), गणेश बाळू मदने (रा. खामगाव, ता. फलटण), कुमार उर्फ बोक्या लक्ष्मण शिंदे (रा. भाडळी खुर्द, ता. फलटण), जयराज उर्फ स्वागत आनंदराव चव्हाण (रा. झिरपवाडी, ता. फलटण), आकाश काशिनाथ डांगे (भाडळी बुद्रुक, ता. फलटण), अनिल गजरे आणि संशयित महिला, अशा सात जणांना पोलिसांनी अटक केली.

पैसे उकळले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन : हॅनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणारे सर्व संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत. या टोळीने फलटणसह लोणंद भागात देखील यापूर्वी लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळले असल्याचा पोलिसांना संशय आहे. कोणाकडून अशाप्रकारे पैसे उकळले असल्यास त्यांनी फलटण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.