ETV Bharat / state

हनीट्रॅपमध्ये अडकून ब्रह्मोस मिसाइलच्या तंत्रज्ञानाची हेरगिरी भोवली, डीआरडीओचे शास्त्रज्ञाला जन्मठेपेची शिक्षा - Nishant Agarwal Case - NISHANT AGARWAL CASE

Nishant Agarwal Case : पाकिस्तानच्या हनीट्रॅप प्रकरणात अडकलेला शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल याने ब्रह्मोस मिसाइलच्या तंत्रज्ञानाची हेरगिरी करून त्याची माहिती शत्रूराष्ट्राला पुरविली होती. या प्रकरणी नागपुरच्या विशेष सत्र न्यायालयाने आरोपी निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Nishant Agarwal Case
जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 5:51 PM IST

नागपूर Nishant Agarwal Case : शत्रूच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल याला ब्रह्मोस मिसाइल हेरगिरी प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये शास्त्रज्ञ निशांत अग्रवालला हेरगिरीच्या प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली होती. पाकिस्तानी एजंट्सच्या हनीट्रॅपमध्ये अडकवून निशांत यांनी ब्रम्होस मिसाईल विषयी माहिती पुरवली होती, असा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर निशांत अग्रवालवर नागपूरच्या विशेष सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. कलम तीन आणि पाच ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नुसार आरोपी निशांत अग्रवालला जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.

घरावर धाड टाकून केली होती अटक : ब्रम्होस एयरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयातील काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवण्याच्या प्रकरणात निशांत अग्रवाल या शास्त्रज्ञाला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तरीत्या नागपूरच्या उज्वल नगर परिसरात भाड्याने राहत असलेल्या निशांत अग्रवालच्या घरावर धाड टाकत अटक केली होती. त्यानंतर निशांत अग्रवालच्या विरोधात शासकीय गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप होता.

गोपनीय माहिती घरच्या संगणकात ठेवली होती : निशांत अग्रवाल शास्त्रज्ञ म्हणून नागपूर येथील ब्राह्मोस एयरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयात ब्रह्मोस मिसाइलच्या निर्मितीशी संबंधित कंपनीमध्ये कार्यरत होते. कार्यालयातील संगणकातील अत्यंत गोपनीय माहिती त्यांनी त्यांच्या घरातील संगणकात ठेवली होती. ती माहिती शत्रूला पुरवल्याचा संशय एटीएसला होता आणि त्या आधारेच ८ ऑक्टोबर १०१८ रोजी यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत निशांत अग्रवाल यांना अटक केली होती. या प्रकरणी आज निशांत अग्रवाल यांना दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. विधानसभा निवडणूक 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात विखे विरुद्ध कोल्हे संघर्ष होणार? - Nashik Teachers Constituency
  2. "निवडणूक आयोग भाजपाची शाखा असल्यासारखा...", संजय राऊतांचा हल्लाबोल - Lok Sabha election results 2024
  3. निवडणूक निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा झटका; कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश - Uddhav Thackeray

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.