मुंबई : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या जागा वाटपात महत्वाची भूमिका बजावत एका पेक्षा एक लोटस ऑपरेशन करणारे देवेंद्र फडणवीस हे सध्या महायुतीच्या केंद्रस्थानी आहेत. लोकसभेच्या अनेक विवादित जागांवर समझोता करण्यात ते सफल झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेक उमेदवारांबद्दल पक्षांतराच्या चर्चा उपस्थित केल्या जातात. यावर बोलताना (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, जेव्हा आम्ही ऑपरेशन लोटस करतो ते माध्यमांना कळत नाही. माध्यमांना जे कळतं ते आमचे ऑपरेशन लोटस नसतं अशी मिश्किल प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
ऑपरेशन लोटस करतो तेव्हा ते माध्यमांना कळतही नाही : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना चाकूरकर यांनी आज भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर मराठवाड्यातील अजून एक बडा नेता भाजपामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा असल्याबद्दल फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना ते म्हणाले की, असा कोणता नेता भाजपामध्ये प्रवेश करणार आहे, हे मलाही माहीत नाही. (Lok Sabha Election 2024) तुम्ही अंबादास दानवे यांच्याविषयी बोलत आहात. परंतु त्यांच्याशी आमचा कुठलाही संपर्क नाही. मराठवाड्यातील एक मोठा नेता अशोक चव्हाण यांच्या नावाने आम्ही अगोदरच पक्षात नेता घेतला आहे. ज्यावेळी आम्ही (BJP operation Lotus) ऑपरेशन लोटस करतो तेव्हा ते माध्यमांना कळतही नाही. माध्यमं जेव्हा एखाद्या ऑपरेशनबाबत चर्चा करतात तेव्हा ते कधीच होत नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे.
महायुतीत दोन ते तीन जागांवर मतभेद : महायुतीच्या जागावाटपाच्या तिढ्याबाबत बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले, आम्ही मान्य करतो की महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजून शिल्लक आहे. परंतु, दोन ते तीन जागांवरच हा तिढा आहे. आज उद्यामध्ये या जागांवर चर्चा करून तो सोडवला जाईल. आमच्या आणि शिवसेनेच्या काही जागा घोषीत केल्या आहेत. अजित पवार हे आज उद्या त्यांच्या जागा घोषीत करतील. ज्या दोन-तीन जागांवर थोडेफार मतभेद आहेत ते सुद्धा लवकरच सोडवले जातील असंही म्हणाले आहेत.
हेही वाचा :
2 लातूरमध्ये दलित कामगाराचं अपहरण करून बेदम मारहाण, डॉक्टरसह 6 जणांवर गुन्हा - Dalit worker beaten