ETV Bharat / state

कमी उंची असल्याचं कारण सांगून नाकारली नोकरी, जिद्दीनं करियर घडवून 600 जणांना देतेय 'दिशा' - SPECIAL STORY in Marathi

Special Story : कमी उंचीमुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असंच काहीस दिशा पांड्या यांच्यासोबत घडलं. कमी उंचीमुळं 16 वेळा त्यांना मुलाखतीत रिजेक्ट करण्यात आलं. पण त्यांनी हार न मानता जिद्दीनं लढत मोठं यश प्राप्त केलंय. वाचा, त्यांची प्रेरणादायी स्टोरी.

disha pandya special story
दिशा पांडे यांची यशोगाथा (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 10:41 PM IST

Updated : Aug 27, 2024, 7:01 AM IST

मुबंई Disha Pandya Special Story : 'सगळं ठीक आहे, पण तू जरा वेगळी आहेस. आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकतो. पण आमच्या कंपनीचे इतर कर्मचारी तुमच्यामुळे विचलित होतील.' 4 फूट 2 इंच उंचीची दिशा पांड्या जेव्हा शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडल्यानंतर त्यांना अशीच कारणं ऐकायला मिळाली. एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल 16 वेळा त्यांना उंचीमुळे मुलाखतीत रिजेक्ट करण्यात आलं. पण, अशाप्रकारे नकार मिळाल्यानं त्यांनी हार मानली नाही. त्यांनी या विरोधात लढायचं ठरवलं. आज दिशा पांड्या यांनी आपलं नाव सार्थकी ठरवत उंचीनं कमी असलेल्या लोकांसाठी एक संघटना स्थापन केली. आज त्या संघटनेच्या माध्यमातून सहाशे लोकांचं नेतृत्व करत आहेत.

दिशा पांडे यांची यशोगाथा (Source - ETV Bharat Reporters)

कमी उंचीच्या लोकांसाठी काम करणारी पहिली संघटना : एखादा मित्र उंचीनं कमी असेल तर त्याची ओळख करून देताना आपण अनेकदा हा 'हाईट कम फाईट जादा' असं गमतीनं म्हणतो. दिशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचंदेखील असंच आहे. आपल्यात असलेल्या कमतरतेचा न्यूनगंड न बाळगता त्यांनी जिद्दीनं लढायचं ठरवलं. आज त्यांची संघटना संपूर्ण देशभरात कार्यरत आहे. उंचीनं लहान असलेल्या लोकांसाठी काम करणारी देशातील ती पहिली संघटना ठरली आहे. या संघटनेला दिशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'लिटिल पीपल ऑफ इंडिया' असं नाव दिलं आहे.

ईटीव्ही भारतशी बोलताना दिशा पांड्या यांनी सांगितलं की, "मी जेव्हा शाळेत जायचे त्यावेळी मला अनेकदा सोबतचे विद्यार्थी चिडवायचे. लहान वयात मी दोन विश्व अनुभवली. एक म्हणजे माझ्या घरचं आणि दुसरं म्हणजे बाहेरच. माझे आई वडील देखील याच आजारानं पीडित असल्यानं मला वाटायचं सगळी लोक आपल्यासारखेच आहेत. पण, जेव्हा शाळेत जायचे त्यावेळी सर्व उलट असायचं. शाळेत जे खेळ खेळले जायचे त्यामध्ये देखील आम्हाला सहभागी होता येत नव्हतं. हाच अनुभव कॉलेजमध्ये आणि हाच अनुभव पुढे नोकरीचा शोध घेताना देखील आला."

मोठ-मोठ्या कंपन्यांसाठी केलंय काम : "आज नोकऱ्यांसाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. जिथं नोकरीच्या रिक्त जागांबद्धल सहज माहिती मिळून जाते. जर तुम्ही 10-12 वर्षे मागे गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की नोकरी शोधण्यासाठी पेपरमधील जाहिराती पाहाव्या लागत होत्या. या जाहिराती पाहूनच मी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जात होते. मला एका कंपनीनं पहिली नोकरी दिली. तिथं मी स्वतःला सिद्ध केलं. सेलो, बजाज यांसारख्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांसाठी मी काम केलंय. आज मी अशाच मोठ्या कंपन्यांसाठी मार्केटिंग करते," असं दिशा यांनी सांगितलं.

दि लिटिल पीपल ऑफ इंडियाची स्थापना- दिशा पांड्या यांनी स्थापन केलेल्या 'दि लिटिल पीपल ऑफ इंडिया' या संस्थेची कहाणी देखील तितकीच रंजक आहे. दिशा एकदा कामावरून घरी जात असताना ट्रेनमध्ये त्यांच्यासारख्याच एका लहान उंचीच्या व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. ही व्यक्ती इतर कोणी नसून जागतिक दर्जाचे पॅरा ॲथलेट मार्क धर्माई होते. मार्क यांनी आपल्यासारख्याच कमी उंचीच्या लोकांसाठी काम करण्याची संकल्पना सुचवली. त्यांनी पाच जणांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. 5 जणांच्या व्हॉट्सॲप ग्रुपपासून झालेली सुरुवात आज 600 जणांच्या व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत पोहोचली आहे. दिशा या संस्थेच्या माध्यमातून सदस्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. "ही लोक रोजगारासाठी सर्कशीत, चित्रपटात आणि सिरीयलमध्ये काम करतात. यांच्यावर जोक केले जातात. त्याचे त्यांना पैसे मिळतात. पण, हे चित्र आता बदललं पाहिजे. इथे प्रत्येकाला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत." असं दिशा म्हणाल्या.

दिशा यांचं 32व्या वर्षी झालं लग्न : दिशा यांचं सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच संघर्षमय राहिलं आहे. अनेकजण त्यांना तुझी उंची कमी आहे. तुझ्याशी लग्न कोण करेल? असं म्हणायचे. पण, दिशा यांनी हार मानली नाही. दिशा यांचं 32 व्या वर्षी लग्न झालं. दिशा यांचे पतीदेखील याच आजारानं ग्रस्त आहेत. त्यांची उंचीदेखील कमी आहे. दिशा सांगतात की, "त्यांचे आणि माझे विचार जुळले. सुरूवातीला काही अडचणी आल्या होत्या. पण आम्ही त्याच्यावर मात केली. आज आम्ही खूश आहोत. आम्हाला दोन मुलं आहेत. मला जेव्हा मुलं झाली त्यावेळीदेखील लोकांनी टोमणं मारण्याची आणि सल्ले देण्याची संधी सोडली नाही. त्यावेळीदेखील मला लोकांनी सांगितलं. तू त्या मुलांचं आयुष्य खराब का करत आहेस? पण मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केला. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहे. मात्र, त्या संघर्षातूनदेखील आनंदी कसं राहायचं, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे एखाद्याला गमतीनं 'हाईट कम फाईट ज्यादा' म्हणण्यापूर्वी त्याच्या आयुष्याची दिशा आधी समजून घ्या," असं दिशा यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. पुण्यातील तरुणानं बनवला विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, डिझेल बरोबरच चालकाचा खर्चही वाचणार - Driverless Electric Tractor
  2. कष्टाचे झाले चीज! अहमदनगरच्या शेतकऱ्याची मेहनत फळाला, डाळिंब पोहोचली थेट मलेशियात! - Pomegranate Farmer Success Story
  3. प्रशिक्षण न घेता जोपासला कलेचा छंद : मालदाडमधील विद्यार्थ्यानं बनवल्या आकर्षक मूर्ती - Attractive sculpture

Last Updated : Aug 27, 2024, 7:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.