मुंबई Electricity Supply Cut : ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत असताना शुक्रवारी दुपारी राज्याचा कारभार चालवणाऱ्या मंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यातील वीज पुरवठा खंडीत झाला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळं मंत्री शंभूराज देसाई वगळता अन्य मंत्री बंगल्यात मुक्कामाला नाहीत. पण याचा फटका बंगल्यातील कर्मचाऱ्यांना बसला. चोवीस तास गारेगार वातावरणात वावरणारे कर्मचारी घामाघूम झाले होते. मंत्री शंभूराज देसाई यांच्या दालनात पत्रकार परिषद सुरू असतानाच वीज गेल्यानं अंधारातच पत्रकार परिषद पुरकावी लागली.
डीपीमध्ये तांत्रिक अडचण : राज्याच्या कारभार पाहणाऱ्या मंत्र्यांची मलबार हील, वाळकेश्वर आणि मंत्रालयासमोर शासकीय निवासस्थानं आहेत. त्यापैकी मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानांसमोरील डीपीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळं या भागातील विज पुरवठा खंडीत झाला. या डीपीतून अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, डॉ. तानाजी सावंत, अदिती तटकरे, दादा भुसे, रविंद्र चव्हाण, शंभूराज देसाई, बाळासाहेब भवन, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवर यांच्या निवासस्थानांना विजपुरवठा होतो. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला. दोन तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडीत होता.
हे वाचलंत का :
- राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
- धंगेकरांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी लवकरच AI टेक्नालॉजी, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती - AI Technology
- EXCLUSIVE: "...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्यावर"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत विरोधकांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचं रोखठोक उत्तर - CM Eknath Shinde Interview