पुणे Deepak Kesarkar On Raj Thackeray : "आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सध्या राजकीय पक्षांकडून सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांचे एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत. म्हणून जेव्हा त्यांच्याशी बोलणं होईल, तेव्हा नक्कीच त्यांचं मतपरिवर्तन होईल," असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बैठकीत बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी २५ जुलै रोजी मुंबईतील रंगशारदा इथं पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री केसरकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, त्यांनी आपलं मत व्यक्त केलय.
विरोधक खोटं आणि रेटून बोलतात : आमदार अपात्रतेबाबत न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "न्यायालयीन प्रक्रिया ही बराच काळ चालत असते. त्यामुळे हा मेजर निर्णय होणार आहे. एक व्यक्ती लोकशाहीत निर्णय घेऊ शकतो का? कोणताही निर्णय घेताना पक्षाची बैठक बोलावली पाहिजे, पण असं झालेलं नाही. आम्हाला जर यातून सुटायचं असतं तर आम्ही सहज दुसऱ्या पक्षात किंवा दुसरा गट तयार केला असता. लोकशाहीच्या रक्षणासाठी आमची लढाई आहे. आज जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार म्हणत आहेl, त्यांनी आरशात पाहावं. सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की, आमदारांनी निवडून आणलेलं हे सरकार आहे. यांना काम करण्याचा अधिकार आहे. उगाच विरोधक खोटं आणि रेटून बोलत आहेत," असंही यावेळी दीपक केसरकर म्हणाले.
मारने से बचाने वाला बडा होता है : मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आता आमदार पाडण्याची भूमिका घेतली जात आहे. याबाबत केसरकर यांना विचारलं असता, ते म्हणाले की ''मारने से बचाने वाला बडा होता है'' 'वाचवणारा हा देव असतो आणि मारणारा हा माणूस असतो आणि मारणाऱ्यांपेक्षा तारणारा हा मोठा असतो'. मनोज जरांगे पाटील हे सेन्सिटिव्ह असून त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या लोकप्रियतेचा वापर दुसरे लोक करत आहेत. असंही दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा
- "मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटलांच्या मनात..."; मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन - Deepak Kesarkar on Manoj
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रात्री उशिरा ‘वर्षा’वर खलबतं: राजकीय चर्चांचा पाऊस? - Shinde Fadnavis Pawar Meeting
- बालभारती पुस्तकाच्या कवितेतील 'वन्स मोर' बाबत शिक्षण मंत्र्यांचे पाठ्यपुस्तक समितीला तपासणीचे निर्देश - Balbharati Book Poem Issue