ETV Bharat / state

संभाजी भिडे यांचं वय बघून त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, दीपक केसरकरांचं मत - Deepak Kesarkar On Sambhaji Bhide - DEEPAK KESARKAR ON SAMBHAJI BHIDE

Deepak Kesarkar On Sambhaji Bhide : संभाजी भिडे काय बोलतात यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही; मात्र वयोमानानुसार एखादी गोष्ट तोंडातून निघून जाते. त्यामुळे त्याला फार काही गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं मला वाटत नाही. संभाजी भिडेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज (1 जुलै) शिर्डीत व्यक्त केलं.

Deepak Kesarkar On Sambhaji Bhide
दीपक केसरकर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 5:44 PM IST

शिर्डी (अहमदनगर) Deepak Kesarkar On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंनी गडकिल्ले संवर्धनासाठी तरुणांमध्ये जागृती करण्याचं काम केलं आहे. त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. अधून मधून त्यांची काही वक्तव्यं येत असतात. त्यांचं वय बघून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं वाटत असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज (1 जुलै) शिर्डीत म्हणाले आहेत.

दीपक केसरकरांचं संभाजी भिडेंच्या वक्तव्याविषयी मत (ETV Bharat Reporter)

केसरकरांचा नागो गाणार यांना सल्ला : नागो गाणार हे चांगले आमदार आहेत. त्यांनी बोलताना विचारपूर्वक बोलावं. अतिशय पारदर्शक पध्दतीनं शिक्षकांची भरती झालेली आहे. त्यामुळे कुठेही एक जरी प्रसंग आढळला तर त्यांनी आणून दाखवावा. ताबडतोब त्यावर अ‍ॅक्शन घेण्यात येईल. पूर्वीच्या काळात ते आमदार असताना त्यावेळी शाळा मंजुरीसाठी परवानगी देताना काय प्रकार घडत होता? बदल्यांच्या संदर्भात काय प्रकार घडत होता, हे सर्वांना माहीत आहे. हे सगळं आम्ही बंद केलं आहे. शिक्षण क्षेत्र निर्मळ आहे आणि ते निर्मळ राहिलं पाहिजे. कुठेही चुकीचं वाटलं तर त्यांनी मला कळवावं. यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंनी बोलताना भान ठेवावं : आदित्य ठाकरे हे स्वत: किती खोके घेत असतील ईश्वराला माहिती आहे. कारण त्यांच्यावर असंख्य आरोप आहेत. परदेशात संपत्ती असल्याचाही आरोप आहे; परंतु आम्ही याचा कधीच उल्लेख करत नाही. याचं कारण उध्दव ठाकरे त्याचबरोबर ठाकरे कुटुंबीयांबद्दल असलेला आदर होय. आदित्यवर कितीतरी आरोप झाले; मात्र आम्ही त्याबद्दल बोललो नाही. त्यामुळे त्यांनीही बोलताना भान ठेवायला हवय, असं शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.

हेही वाचा:

  1. ''उद्धव ठाकरे, संजय राऊत हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे लाचार'', अतुल भातखळकर यांची घणाघाती टीका - Atul Bhatkhalkar
  2. नीट परीक्षा पेपरफुटीतील लातूरमधील आरोपींचा आज सीबीआय घेणार ताबा, मोठे मासे गळाला लागणार का? - Latur NEEt Exam Scam
  3. पावभाजी विक्रेत्याला घातला सायबर गंडा, कर्जासाठी अ‍ॅपवर घेतली वैयक्तिक माहिती, नवीन कायद्यानुसार मुंबईत पहिला गुन्हा दाखल - Cyber Criminal Cheated Businessman

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.