ETV Bharat / state

फेअरप्ले ॲप प्रकरणी ईडीचं धाडसत्र, मुंबई आणि पुण्यात एकूण १९ ठिकाणी छापेमारी - ED Raid In Mumbai - ED RAID IN MUMBAI

ED Raid In Mumbai : फेअरप्ले ॲपप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) धाडसत्र सुरू केले आहे. मुंबई आणि पुण्यात एकूण १९ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.

ED Raid In Mumbai
ईडी धाडसत्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 8:14 PM IST

Updated : Jun 13, 2024, 10:40 PM IST

मुंबई ED Raid In Mumbai : फेअरप्ले ॲपप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) धाडसत्र सुरू केले आहे. मुंबई आणि पुण्यात एकूण १९ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.

महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचा दावा : आयपीएल सामन्यांचे अनधिकृत प्रक्षेपण आणि बेटिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. लोकसभेच्या निकालांवर देखील सट्टेबाजी केल्याचा दावा ईडीने केला आहे. या छापेमारी दरम्यान एकूण ८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त तसेच गोठवल्याचा दावा ईडीने केला आहे. या धाडसत्रात रोकड, महागडी घड्याळे, बँक आणि डिमॅट खात्यांची माहिती तसेच गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे सापडल्याचा देखील दावा ईडीने केला आहे.

8 कोटीची मालमत्ता जप्त : अंमलबजावणी संचालनालय (ED), मुंबई विभागीय कार्यालयाने १२ जून रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA), 2002 अंतर्गत मुंबई आणि पुण्यातील 19 ठिकाणी “फेअरप्ले” प्रकरणी चालू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून छापे टाकले होते. ईडीच्या धाडसत्रादरम्यान रोख रक्कम, बँक निधी, डीमॅट खाते होल्डिंग्ज आणि लक्झरी घड्याळे अशी अंदाजे 8 कोटीची मालमत्ता जप्त तसेच गोठवण्यात आली. इतर अनेक गुन्ह्यासंदर्भातील दस्तऐवज आणि डिजिटल उपकरणे देखील जप्त करण्यात ईडीला यश आले आहे.

कॉपीराईट अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल : क्रिकेट मॅच दाखवण्याचे राइट्स वाय कॉम १८ च्या मालकीचे voot या कंपनीकडे असताना 'फेअरप्ले' या अ‍ॅपने देखील दाखवल्याने वाय कॉम 18 तर्फे याप्रकरणी महाराष्ट्र नोडल सायबर पोलीस सेलमध्ये 20 एप्रिल 2023 ला भारतीय दंड संविधान कलम 420, 120 ब आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 43, 66, 66 ब आणि कॉपीराईट अ‍ॅक्ट कलम 63 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर 2021 पासून ते 20 एप्रिल 2023 पर्यंत कालावधीत हा गुन्हा घडला आहे.

पेड कंटेंट अनधिकृत अ‍ॅपवर दाखविले जायचे : वाय कॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पायरसी संदर्भात कायदेशीर कामकाजाची कार्यवाही करण्यासाठी कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट ऑफ लीगल या पदावर काम करणारे, विनीत चंद्र शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पायकोमेटिनमध्ये अनेक टीव्ही चॅनेल्स आणि एक वूट ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. उठ ओटीटी प्लॅटफॉर्मवर कलर्स एम टीव्ही, निक आणि कलर्सचे प्रादेशिक चैनल उपलब्ध आहेत. तसेच चित्रपट मालिका कलर्सचे प्रादेशिक चैनल देखील उपलब्ध आहेत. वाय कॉम एटीन वरील बरेचसे चॅनल उठ सिलेक्टवरील कॉन्टॅक्ट हे सबस्क्रिप्शन आधारित असून ते पाहण्यासाठी पैसे भरावे लागतात. ऑक्टोबर 2021 मध्ये बायकॉम एटीन कंपनीच्या अँटिपायरसी टेक्निकल टीमने शर्मा यांना कळवले की, वायकोमेटींचे बरेचचे पेड कॉन्टेन्ट पिकासो ऐप, फॉक्सि ऐप वेदू अ‍ॅप स्मार्ट प्लेयर लाईट अ‍ॅप, फिल्म प्लस अ‍ॅप टीटीव्ही अ‍ॅपवर अनाधिकृतपणे दाखवले जात आहेत.

शेल संस्थांची 400 हून अधिक बँक खाती वापरली : फेअरप्लेने दुबई आणि कुराकाओ येथील विदेशी संस्थांमार्फत प्रसिद्ध व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय एजन्सींसोबत करार केल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे. असे आढळून आले की, भारतीय एजन्सींनी फेअरप्लेच्या जाहिरातीसाठी करार अंमलात आणण्यापूर्वी त्याबाबत कोणतीही योग्य काळजी घेतली नाही. तसेच आता पर्यंत केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की, मे. फेअरप्लेने विविध बोगस/शेल बँक खात्यांद्वारे निधी गोळा केला होता. नंतर तो निधी बोगस बिलिंगमध्ये सामील असलेल्या फार्मा कंपन्यांमध्ये जमा झाला होता. तपासात पुढे असे दिसून आले की, या कंपन्यांचा निधी हाँगकाँग एसएआर, चीन आणि दुबई येथील परदेशी शेल संस्थांना पाठवण्यात आला आहे. फेअरप्लेद्वारे लोकांकडून गोळा केलेल्या निधीच्या वापरासह अनेक उद्देशांसाठी शेल संस्थांची 400 हून अधिक बँक खाती वापरली जात असल्याचं आढळून आलं.

हेही वाचा :

  1. नागपुरात स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट; पाच कामगारांचा होरपळून मृत्यू - NAGPUR Blast
  2. लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर लागणार वर्णी; अर्ज केला दाखल - Sunetra Pawar
  3. मनसेच्या इंजिनाची दिशा काय? विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे राज ठाकरेंचे आदेश - Raj Thackeray on Assembly Election

Last Updated : Jun 13, 2024, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.