ETV Bharat / state

शहानिशा न करता फ्लॅट देणं आलं अंगलट, भाडेकरू तस्कर निघाल्यानं घरमालकावरच गुन्हा दाखल - Drug Smuggling Case Bhiwandi - DRUG SMUGGLING CASE BHIWANDI

Drug Smuggling Case Bhiwandi : गुजरातच्या एटीएस पथकानं भिवंडी परिसरात छापेमारी करून 800 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. यावेळी 2 ड्रग्ज माफियांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, कोणतीही शहानिशा न करता ड्रग्ज माफियांना भाड्यानं फ्लॅट देणाऱ्या घरमालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

Drug Smuggling Case Bhiwandi
ड्रग्ज तस्कराला अटक (ETV Bharat Reporter) (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 9:34 PM IST

Updated : Aug 9, 2024, 10:03 PM IST

ठाणे Drug Smuggling Case Bhiwandi : गुजरातच्या एटीएसने भिवंडी परिसरातील नदी नाका भागात असलेल्या एका इमारतीतमधील फ्लॅटमध्ये छापेमारी करीत सुमारे 800 कोटी रुपयांच्या ड्रग्सच्या साठ्यासह नशेच्या दोन सौदागरांना अटक केली. मात्र या भिवंडीत सुरू असलेल्या एवढ्या मोठ्या गोरखधंद्याबद्दल भिवंडी पोलीस प्रशासनाला माहिती नव्हती. ड्रग्स माफियांना भाड्यानं फ्लॅट देणाऱ्या घरमालकावर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. अजगर अली इस्मालउद्दीन अन्सारी (41, रा. फातिमाचाळ, अमीना बाग भिवंडी ) असं गुन्हा दाखल झालेल्या घरमालकाचं नाव आहे.

ड्रग्ज तस्करांच्या कारभाराविषयी माहिती देताना स्थानिक रहिवाशी (ETV Bharat Reporter)

शहानिशा न करता भाड्यानं दिला फ्लॅट : गेल्या काही वर्षांत भिवंडी शहर आणि ग्रामीण भाग सराईत गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाल्याच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. विशेषतः हे गुन्हेगार भाड्याच्या घरातच वास्तव करून शहरात गुन्हेगारी करीत असल्याचं अनेकदा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे, घरात भाडोत्री ठेवल्यास त्यांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात घरमालकाला देणं कायद्यानं बंधनकारक आहे. घरमालक अजगर अली यांच्या मालकीचा फरीदबाग मधील इस्माईल मेन्शन या सात मजली इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे. हाच फ्लॅट त्यांनी मोहमद इजाज मोहंमद सुलेमान शेख (41, रा. सेंट्रल मुंबई) यांना आठ महिन्यांपूर्वी भाड्यानं दिला होता. मात्र माफियांची माहिती पोलिसांना दिली नव्हती. त्यामुळं ड्रग्स माफियांचा हा गोरखधंदा बिनबोभाटपणे सुरू होता.

782.263 किलो एमडी द्रव जप्त : गुजरातमध्ये 41 कोटीच्या ड्रग्सच्या आरोपींनी भिवंडीत पकडलेल्या मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल या दोन भावांचा या धंद्यात सहभाग असल्याचं समोर आलं. दोघेही भिवंडीतील नदी नाका परिसरातील असून ते एमडी (अंमली पदार्थ) उत्पादनात गुंतलेले असल्याची माहिती गुजरात पथकाला मिळाली. पथकानं तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांच्या ठिकाणांची पुष्टी केली. त्यानंतर 5 आणि 6 ऑगस्ट रोजी गुजरात एटीएस पथकानं आरोपीच्या भिवंडी फ्लॅटवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, त्यांच्याकडून 782.263 किलो एमडी द्रव जप्त करण्यात आले. तयार करण्याच्या प्रक्रियेत 10 किलो एमडी सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार एमडीची एकूण किंमत 800 कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त, पथकानं त्या ठिकाणाहून अंमली पदार्थ निर्मितीसाठी वापरलेली सर्व उपकरणे जप्त करून गुजरातला घेऊन गेले.

ड्रग्जचे कनेक्शन उघडकीस : गुजरात एटीएसच्या कारवाई आधीच त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाही या माफियांच्या गोरखधंद्याचा संशय आला होता. त्यामुळे 72 वर्षीय रहिवाशी मुसद्दीक इस्माईल फरीद यांनी 28 जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास त्या दोघा माफियांना अडवले होते. त्यावेळी हे दोघे आरोपी 50 किलोच्या 5 ते 6 ड्रममध्ये पावडर घेऊन येत होते. त्यांना हटकले असता कॉस्टिक सोडा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी फरीद यांना या दोघांवर संशय आला होता. त्यानंतर गुजरात एटीएसच्या कारवाईत ड्रग्सचे घबाड समोर आले.

भिवंडीत पाकिस्तान नागरिकांचा रहिवास : गेल्याच वर्षी भिवंडी शहरातून देशविघातक व दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. भिवंडी तालुक्यातील पडघा बोरीवली गावातून इसिसच्या 6 ते 8 दहशदवाद्यांना एनआयच्या पथकानं छापेमारी करून अटक केली होती. यातील चार दहशदवादी भाड्याच्या घरात राहत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं होतं. शिवाय तालुक्यात 2018 पासून 30 हून अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली. असे असतानाच काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी नागरिकांचा भिवंडीत वावर असल्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात आजही देशविघातक आणि गंभीर गुन्ह्यांच्या कारवायांसाठी काही जण सक्रिय असल्याचं समोर आले आहे.

हलगर्जीपणा आला अंगलट : भिवंडीतील कमी लोकसंख्येच्या परिसरात सहा ते सात महिन्यांपूर्वी माफियांनी ड्रग्स निर्मितीचे काम सुरू ठेवण्यासाठी फ्लॅट भाड्याने घेतला होता. तर या गुन्ह्यातील तिसरा साथीदारही असून तो फरार असल्याची माहितीही समोर आली आहे. यासंदर्भात निज्मपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड म्हणाले, " आरोपीने घर भाड्याने देताना त्याची माहिती पोलिसांना दिली नाही. त्यामुळं घरमालक अजगर अली अन्सारी याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच घरमालकाला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार भरत मुरकुटे करीत आहे."

हेही वाचा :

  1. गुजरात ATS ची मोठी कारवाई; भिवंडीतून 800 कोटीचं ड्रग्ज जप्त, दोघांना अटक - ATS Gujarat On Drugs Case
  2. एनसीबीची मोठी कारवाई! ड्रग्ज तस्कराला सायन सर्कलहून अटक; 10 कोटींचं 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त - Drug Smuggler Arrested
  3. ड्रग्जविरोधात सरकार अ‍ॅक्शन मोडवर, पाच महिन्यात केला ४ हजार कोटींचा माल जप्त, ६ पोलीस बडतर्फ - State Government Action On Drug

Last Updated : Aug 9, 2024, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.