ETV Bharat / state

चाळीस वर्षापूर्वी केलेली चूक डॉक्टरला भोवली! शस्त्रक्रियेत हाताची नस कापल्यानं झाला होता रुग्णाचा मृत्यू; हायकोर्टानं केला पाच लाखाचा दंड - चूक डॉक्टरला भोवली

Dr Pinto : शस्त्रक्रिया करताना रुग्णांच्या हाताची नस कापल्यानं रुग्ण दगावला होता. त्यानंतर रुग्णांच्या वारसांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला डॉक्टरनं जुमानलं नाही. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. चाळीस वर्षानंतर या केसचा निकाल लागलाय.

Bombay High Court
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 12:57 PM IST

मुंबई Dr Pinto : डॉक्टर अनिल पिंटो यांच्याकडून फेब्रुवारी 1984 मध्ये रुग्णाच्या हाताची एक नस कापली गेली होती. यामुळे रुग्णाचा तीन दिवसांनी मृत्यू झाला. त्याबाबत पाच हजार रुपये दंड आणि शिक्षा सत्र न्यायालयानं ठोठावली होती. परंतु डॉक्टरांनी हायकोर्टात अपील केलं. आता मुंबई उच्च न्यायालयानं पाच लाख रुपये दंड आणि दहा दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हा आदेश ९ फेब्रुवारीला दिला.

शस्त्रक्रिया करताना कापली नस : फेब्रुवारी 1984 मध्ये रुग्ण प्रकाश यांना डॉक्टर अनिल पिंटो यांच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली. परंतु उपचार करताना डॉक्टरकडून शस्त्रक्रिया करताना काही चूक झाली. डॉक्टरांनी ऑपरेशन करत असताना प्रकाश यांच्या एका हाताची नसच कापली. त्यानंतर तीन दिवसांनी रुग्णाचा मृत्यू झाला. परिणामी त्यांच्या वारसांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

शस्त्रक्रिया करताना केला निष्काळजीपणा : सत्र न्यायालयाच्या निर्णयाचं पालन डॉक्टरनं केलंच नाही. मुंबई सत्र न्यायालयानं घटनेच्या दहा वर्षानंतर डॉक्टर अनिल पिंटो यानं रुग्णाच्या संदर्भात शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केला, या तथ्यांच्या आधारे दोषी ठरवलं. त्याला दहा दिवसाचा कारावास तसंच पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्याचा निर्णय दिला होता.

वारसांनी घेतली उच्च न्यायालयात धाव : सत्र न्यायालयाच्या निर्णयाचं पालन डॉक्टरनं केलं नाही. त्यामुळे मृत्यू झालेले रुग्ण प्रकाश यांच्या वारसांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या न्यायालयात वारसांच्या वतीनं वकिलांनी मुद्दा मांडला की, "सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाला डॉक्टर अनिल पिंटो जुमानत नाहीत. रुग्णाच्या हाताची एक नस ज्या पद्धतीनं कापली, त्यामध्ये निष्काळजीपणा केला म्हणून रुग्ण दगावला."

मुंबई उच्च न्यायालयानं ठोठावला दंड : डॉक्टरांच्या वतीनं वकिलांचं म्हणणं होतं, की "एखाद्या व्यवसायाच्या निर्णयामध्ये झालेली चूक म्हणजे तो निष्काळजी असे मानले जाऊ शकत नाही." परंतु या घटनेमध्ये "डॉक्टर हा तज्ञ सर्जन आहे. जेव्हा तज्ञ सर्जन एका रुग्णाला त्याच्या हाताची धमनी कापली गेल्यानंतर बारा तासापर्यंत तो वाट पाहतो. त्यामुळे नक्कीच गुंतागुंत झाली आणि त्यावर डॉक्टरांनी तातडीनं इलाज करणं अपेक्षित होतं. परंतु ते झालं नाही. म्हणूनच नुकसान भरपाई दंड म्हणून पाच लाख रुपये नातेवाईकाला द्यावे लागतील. तसंच दहा दिवसाची शिक्षा कायम राहील," असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला.

हेही वाचा :

  1. मनोज जरांगेच्या आंदोलनादरम्यान कायदासह सुव्यवस्था राखणं शासनाची जबाबदारी, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
  2. रवींद्र धंगेकरांच्या मतदार संघातील विकासनिधी वळवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.