ETV Bharat / state

डोंबिवली एमआयडीसी स्फोटातील मृतांचा आकडा 11 वर; कंपनी मालकाला नाशिकमधून अटक - Dombivli MIDC Blast - DOMBIVLI MIDC BLAST

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत गुरूवारी (23 मे) दुपारी मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून या बचावकार्यादरम्यान आज आणखी तीन मृतदेह सापडले आहेत.

Dombivli MIDC Blast Death toll rises to 9
डोंबिवली एमआयडीसी स्फोटातील मृतांचा आकडा 9 वर (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 10:59 AM IST

Updated : May 24, 2024, 5:02 PM IST

मुंबई Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून शोधकार्य सुरु या बचावकार्यादरम्यान आज (24 मे) आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळं या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर पोहोचला असून 60 हून अधिक लोक जखमी आहेत.

नेमकं काय घडलं? : डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान या हार्डनर बनवणाऱ्या कंपनीतील रिॲक्टरचा गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. हा स्फोट इतका भयानक होता की, त्यामुळं शेजारील कंपन्या, दुकानं आणि रहिवासी इमारतींचं मोठं नुकसान झालं. शेजारील कंपन्यांमध्ये आग पसरली तर स्फोटामुळं अनेक दुकानांच्या आणि रहिवासी इमारतीमधील घरांच्या काचा फुटल्या. यातील जखमींवर एम्स आणि नेपच्युन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचं समजतं. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावं अद्याप समजू शकलेली नाही. 2016 मध्ये याच ठिकाणी झालेल्या प्रोबेस स्फोटाची आठवण या दुर्घटनेनं झाली. ज्यामध्ये 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल : कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली होती. परंतु या बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या कंपनीत कोणतीही परवानगी घेतलेला अधिकृत बॉयलर नव्हता, अशी माहिती चौकशीदरम्यान पुढं आली. यानंतर पोलिसांनी कंपनीचे मालक प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

धोकादायक कंपन्यांचं स्थलांतर करणार : या भीषण स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सत्ताधारी महाविकास आघाडीने काहीच केले नाही- शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली. कारखान्याच्या मालकांवर हत्येचा गुन्हा दाखल करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावे, अशी त्यांनी मागणी केली. महाविकास आघाडी सरकारनं धोका असलेले पाच कारखाने हलविण्याची योजना आखली होती. मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीने काहीच केले नाही, असा त्यांनी आरोप केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार- 11 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले अमुदान कारखान्याचे मालक आणि मेहता कुटुंबीय हे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार आहे. आरोपींना पकडण्यासाठी एकूण 5 पथके तयार करण्यात आली आल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितलं नाही. ठाणे पोलिसांच्या माहितीनुसार रासायनिक प्रक्रिया आणि कच्चा मालाच्या साठवणुकीबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे कारखान्यात स्फोट झाल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; एकनाथ शिंदेंची घोषणा - Dombivli MIDC Blast
  2. डोंबिवली घटनेवरुन अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'सरकार कारवाई नाही उलट धंदा..." - Dombivli fire Incident
  3. डोंबिवली स्फोट दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Dombivli MIDC Blast incident

Last Updated : May 24, 2024, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.