ETV Bharat / state

बुलढाणात गर्भलिंग निदान करताना डॉक्टरांना रंगेहात पकडलं; आरोग्य विभागाच्या विशेष पथकाची कारवाई - GESTATIONAL DIAGNOSIS

बुलढाणा आरोग्य विभागाच्या विशेष पथकानं गर्भलिंग निदान करताना डॉक्टरला रंगेहात पकडलं आहे.

Buldhana News
गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2024, 7:53 PM IST

बुलढाणा : एकीकडं राज्य सरकार 'लाडकी बहीण योजना' राबवून महिलांच्या बाबतीत कल्याणकारी भूमिका घेताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडं सुरू असलेल्या गर्भपातामुळं मुलींच्या जन्मात घट होत आहे. बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांच्या आदेशान्वये एका पथकानं जिल्ह्यात तीन ठिकाणी पीसीपीएनडीटी च्या कायद्यन्वये कारवाई केली. त्यात नांदुरा, मेहेकर आणि रिसोड या ठिकाणी धाड टाकली असता दोषी आढळल्यानं सोनोग्राफी मशीन सील केल्या आहेत.

काय आहे घटना? : शुक्रवारी एका महिलेचा पाठलाग करत वाशिमच्या रिसोड येथील शिव मूळव्याध हॉस्पिटल आणि प्रसूती गृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती.

प्रतिक्रिया देताना डॉ. भागवत भुसारी (ETV Bharat Reporter)

औषध आणि साहित्य जप्त : बुलढाणा, वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरण्यात आलेली औषधं आणि साहित्य जप्त करण्यात आलं आहे. घटनास्थळी डॉ. अमोल भोपाळे उपस्थित असल्यानं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अधिक आरोपी असण्याची शक्यता आहे.

गर्भपात केल्यास कडक कारवाई होणार : गर्भलिंग तपासणी करणं आणि अवैध गर्भपात करणं हे कुकर्म आहे. असे सर्व प्रकार बंद झाले पाहिजेत. जर कोणी असं करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा, यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिला.

सोनोग्राफी केंद्राची माहिती देणाऱ्याला बक्षीस : नाशिक येथे अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची माहिती देणाऱ्याला शासनाकडून एक लाख रुपये बक्षीस देण्यात येतं. तसंच माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येतं. त्यामुळं भीती न बाळगता गर्भलिंग निदान करणाऱ्या संशयित केंद्राची माहिती द्यावी, असं आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केलं होतं.

हेही वाचा -

  1. नाशिककरांना आजही 'मुलगी' नकोशी; जन्मदराचं प्रमाण घटलं, गर्भलिंग निदान चाचण्यांचं प्रमाण वाढलं
  2. दहावी नापास मुन्नाभाईनं संपूर्ण मराठवाड्यात पसरविलं गर्भलिंग निदानाचं जाळं, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
  3. गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर छापा, 'त्या' जाहिरातीमुळे फुटलं बिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.