पुणे Written Dnyaneshwari : दुबईस्थीत पुणेकर अभियंत्यानं सलग सव्वाशे दिवस दररोज पहाटे चार तास बसून पाचशे पानांची सार्थ ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहिण्याचा भारताबाहेर जगातला पहिला अक्षरसेवा संकल्प पुर्ण केला. विश्वकल्याणाची आस असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची 'अक्षरसेवा' वैश्विक करणारे नितीन माने यांचं सर्वस्थरातून कौतूक होत आहे.
संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी लिखानास सुरुवात : नितीन माने हे गेल्या अनेक वर्षापासून दुबईत असून शारजाह येथील गणेश भजन मंडळाच्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या आयोजनात गेली आठ वर्षे त्यांचा सहभाग आहे. असं असताना आठ महिन्यांपुर्वी त्यांचे सांगली जिल्ह्यातील मुळ गाव उरुण-ईस्लामपूरचे श्रध्दास्थान संभूअप्पा मठात असता श्री ज्ञानेश्वरी सेवा समितीचा 'ज्ञानेश्वरी' वाटप कार्यक्रमात संत साहित्याचे गाढे अभ्यासक हभप कै. रघुनाथ रामचंद्र पाटील (आप्पा) यांच्या प्रेरणेनं हभप दशरथ पाटील यांनी स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहिण्याचा संकल्प सार्वजनिक केला होता. हा अक्षरयज्ञ पेलण्यास ईच्छूक असणाऱ्यांना ज्ञानेश्वरीचं वाटप केलं जात होतं. याच अक्षरसेवेत सहभागी होण्याचं आवाहन दशरथ पाटील यांनी नितीन माने यांना केलं. माने यांनीही तत्काळ होकार दिला. ज्ञानेश्वर माऊलींचाच आदेश आहे, असं मानून 11 डिसेंवर 2023 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी माने यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यास सुरवात केली.
कसा केला संकल्प पुर्ण : तब्बल 36 वर्षांनी त्यांच्या हातून मराठी शब्द कोऱ्या पानावर उमटू लागले. पहिल्या दिवशी एक पान सुलेखन करायला त्यांना दोन तास लागले. रोज दोन तास तर अनेकदा पाच तास दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा आणखी एखादा तास जास्तीचा देवून 17 एप्रील 2024 रोजी रामनवमीपर्यंत 129 दिवसांत 509 पानांची ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून पुर्ण केली. श्लोक आणि ओव्यांचा अर्थ समजावा म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कारी भूमी सेवा न्यासाचे संस्थापक मधुसूदन महाराजांंची मदत घेतली. सव्वाचार महिन्यात रोमारोमात ज्ञानेश्वरीचे शब्द न् शब्द भिनल्याची अनुभूती माने यांना झाली आहे. एवढंच नव्हे तर माऊलींच्या पालखी सोहळ्यातच माऊलींच्या चरणी अक्षरयज्ञ स्थिरावा म्हणून माने यांनी थेट पुणे गाठलं आणि आळंदीत माऊलींच्या दर्शनानं या संकल्पाचं वैश्वीक वर्तुळ पुर्ण केलं.
हेही वाचा :