ETV Bharat / state

बंदी छोड दिनानिमित्त 'हल्लाबोल' कार्यक्रम; अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम - HALLABOL PROCESSION IN SACHKHAND

नांदेडमध्ये शीख बांधवांचा 'हल्लाबोल' कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून लाखो शीख बांधव सहभागी झाले होते. प्रत्येक दिवाळीला हा हल्लाबोल साजरा करण्यात येतो.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2024, 5:11 PM IST

नांदेड : नांदेड येथे शीख बांधवांचा 'हल्लाबोल' कार्यक्रम काल (2 नोव्हेंबर) झाला. शीख धर्माचे सहावे गुरु हरगोविंद सिंगजी महाराज यांच्या स्मरणार्थ 'बंदी छोड दिन' साजरा केला जातो. याच बंदी छोड दिनानिमित्त नांदेड येथे हल्लाबोल कार्यक्रम झाला. गुरुद्वारामध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर हल्लाबोल चौकातून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून लाखो शिख बांधव सहभागी झाले होते. प्रत्येक दिवाळीला हा हल्लाबोल कार्यक्रम साजरा करण्यात येतो.

तोफांची सलामी : दरवर्षीप्रमाणे यंदाही नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब येथे बंदी छोड दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला. गुरुद्वार सचखंड बोर्डाचे प्रशासक विजय सतबीर सिंघ माजी आय. ए. एस. म्हणाले की, "बंदी छोड दिनानिमित्त तख्त साहिब येथे जगभरातील भाविकांनी दीपप्रज्वलन करून गुरुजींबद्दल भक्ती आणि प्रेम व्यक्त केलं. प्राचीन परंपरेनुसार दीपमाला महल्ल्याला तोफांची सलामी देण्यात आली. जत्थेदार सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ जी आणि पंज प्यारे साहिबांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन परंपरेनुसार तख्त साहिब येथे दुपारी 4 वाजता अरदास केल्यानंतर दीपमाला महल्ला पूर्ण वैभवात बाहेर काढण्यात आला. यावेळी वाद्य पथकं, कीर्तन मंडळी आणि देशभरातील भाविक सहभागी झाले होते.

शीख बांधवांचा 'हल्लाबोल' कार्यक्रम संपन्न (Source - ETV Bharat Reporter)

प्राचीन परंपरा : "खालसा हल्ला बोल चौक" मध्ये प्राचीन परंपरेनुसार "हल्ला" करण्यात आला. ही अनोखी शैली प्राचीन काळातील गुरूजींच्या खालसानं लढलेल्या युद्धांची आठवण करून देते. यानंतर दीपमाला महल्ला गुरुद्वारा बाऊली दमदमा साहिब, बाफना चौक, शहीद भगतसिंघ रोड, अबिचलनगर, जुना मोंढा यामार्गे गुरुद्वारा नगिनाघाट साहिब येथे पोहोचला.

प्रशासक विजय सतबीर सिंघ जी, स. जसवंत सिंघ बॉबी यांनी बंदि छोड दिवस दीपमाला महल्लामध्ये सहभागी झालेल्या देशा-विदेशातील भाविक, संत महापुरुष आणि हजुरी साधसंगत यांचे आभार व्यक्त करुन व अभिनंदन केले, अशी माहिती अधिक्षक, गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाकडून देण्यात आली.

हेही वाचा

  1. भरधाव बोलेरोनं रस्त्यावरील पाच जणांना चिरडलं; ऐन दिवाळीत कुटुंबांवर शोककळा
  2. मुंबईकरांनो, भाऊबीजेसाठी घराबाहेर पडताय? बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आज संप
  3. गायी गोंदणनिमित्त मतदान जनजागृती मोहीम, बलिप्रतिपदानिमित्त स्वीप अंतर्गत विशेष मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.