ETV Bharat / state

व्हिडिओ कॉलवरून वाद; नवऱ्याचा बायकोच्या गालावर चावा, पत्नी जखमी - Husband Wife Dispute - HUSBAND WIFE DISPUTE

Husband Wife Dispute: व्हिडीओ कॉलवर बोलण्याच्या वादातून पती-पत्नीत भांडण झाले. यामध्ये चिडलेल्या पतीने पत्नीच्या गालावर चावा घेतला. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Husband Wife Dispute
पती पत्नी वाद (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 10:54 PM IST

Updated : May 7, 2024, 11:01 PM IST

नाशिक Husband Wife Dispute : पत्नीने पतीला तुम्ही कोणाशी व्हिडीओ कॉलवर बोलत आहात, असे विचारल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या गालावर जोरदार चावा घेतला. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून या विरोधात पती, सासू-सासरे यांच्या विरोधात पत्नीने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पत्नीला उपाशीपोटी घरात डांबले : पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पती सुरेश (नाव बदललेले) यांच्यासोबत 2023 मध्ये लग्न झाले आहे. पती कोणासोबत तरी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना पत्नीने पाहिले. याबाबत तिने त्याला विचारणा केली असता संशयित पतीचा संताप अनावर झाला आणि त्याने तिला बेदम मारहाण करत तिच्या गालावर जोरात चावा घेतला. यात ती गंभीर जखमी झाली सासू-सासर्‍यांनी ही मध्यस्थी न करता आपल्या मुलाचीच बाजू घेतली आणि तिचा शारीरिक, मानसिक छळ केला. पतीने रात्री मारहाण करत पत्नीला उपाशी पोटी घरात डांबून ठेवले आणि नंतर घराबाहेर काढले. या प्रकरणी पत्नीने नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पतीकडून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी : दुसऱ्या एका प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विवाहिता ही नोकरी निमित्त मुंबईतील बोरिवली येथे राहते. ही विवाहिता 28 मार्च 2022 ते 5 मे 2024 या कालावधीत नाशिक आणि मुंबई येथे सासरी राहत होती. दरम्यान पती सासरची मंडळी संगनमत करून विवाहितेकडे पैशासह दागिन्यांची मागणी करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच पतीने फिर्यादी पत्नीची इच्छा नसताना तिचे काढलेले फोटो व व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा लैंगिक छळ केला. तसेच तिच्या अंगावरील दागिने काढून घेत पैशाचा अपहार केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. "कसाबची बाजू घेत काँग्रेस पाकिस्तानला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - PM Narendra Modi in Ahmednagar
  2. तिसऱया टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदानाची नोंद; देशात सरासरी 61 टक्के मतदान - Lok Sabha Election 2024
  3. "शरद पवार आणि राजनाथ सिंह यांचं सेटलमेंट...", प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, राजकीय वाद पेटणार? - Prakash Ambedkar

Last Updated : May 7, 2024, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.