ठाणे Amudan chemical blast case : डोंबिवली फेज दोन भागातील एमआयडीसीमध्ये अमुदान कंपनीतील स्फोटातील मुख्य आरोपी मलय प्रदीप मेहतांना (वय 38 वर्षे) 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मेहतांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं ठाण्यातून अटक करून आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयानं त्यांना 29 मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या आई मालती मेहता (वय 70) नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक तसंच ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. तर शुक्रवारीच बॉयलर स्फोटप्रकरणी मालती मेहता, त्यांचा मुलगा मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
45 तासांनंतरही शोध मोहिम सुरू : डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत आतापर्यंत मृतांचा आकडा 13 वर गेला असून 65 नागरिक जखमी झाले आहेत. दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमकडून 45 तासांनंतरही शोध मोहिम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण अद्यापही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या भीषण आगीनं अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळं स्फोट प्रकरणातील अरोपींवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
संचालकाविरुद्ध गुन्हा : विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसापूर्वीच संचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. एफआयआरमध्ये मलय प्रदीप मेहता, मालती प्रदीप मेहता तसंच इतर संचालक, व्यवस्थापन कर्मचारी, कारखान्यावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपीवर ठाणे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पराग मणेरे, शिवराज पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, सहायक पोलीस शेखर बागडे, पोलीस निरीक्षक श्रीमती वनिता पाटील, सुनील तारमाळे, पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोहवा ठाकुर, पोहवा भोसले, पोना हिवरे, पोकों तानाजी पाटील यांनी कामगिरी पार पाडली आहे.
'हे' वाचलत का :
- डोंबिवली एमआयडीसीतील कारखाने जणू 'मृत्युचे कारखाने', २०११ पासून ५५ दुर्घटनांमध्ये ५० पेक्षा जास्त बळी - dombiwali MIDC blast
- डोंबिवली स्फोट प्रकरणातील कंपनी मालकांना नाशिक आणि ठाण्यातून अटक - dombivli midc blast
- डोंबिवली एमआयडीसी स्फोटातील मृतांचा आकडा 11 वर; कंपनी मालकाला नाशिकमधून अटक - Dombivli MIDC Blast