ETV Bharat / state

मुंबईत चालणारं एकमेव इंजिन राज ठाकरे यांचं होतं, ते आता आमच्या सोबत - देवेंद्र फडणवीस - Piyush Goyal Office Inauguration - PIYUSH GOYAL OFFICE INAUGURATION

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (10 एप्रिल) मुंबईतील कांदिवलीत बोलताना म्हणाले की, मुंबईत धावणारं एकमेव इंजिन राज ठाकरे यांचं असून त्या इंजिननेसुद्धा मोदी यांना पाठिंबा दिलायं. तसंच उत्तर मुंबई मतदार संघामध्ये सर्वांत जास्त रेकॉर्ड ब्रेक मतांनी पियुष गोयल यांचा विजय होणार आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 9:21 PM IST

देवेंद्र फडणवीस कांदिवलीतील सभेत बोलताना

मुंबई Devendra Fadnavis : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते आज (10 एप्रिल) करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्थ पाठिंबा दिला त्याची आठवण करून दिली. सोबतच मुंबईत धावणारं एकमेव इंजिन राज ठाकरे यांचं असून त्या इंजिननेसुद्धा मोदी यांना पाठिंबा दिल्याचं म्हटलं आहे. तसंच उत्तर मुंबई मतदार संघामध्ये सर्वांत जास्त रेकॉर्ड ब्रेक मतांनी पियुष गोयल यांचा विजय होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला.

पहिल्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आज (10 एप्रिल) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पियुष गोयल हे मोदींच्या टीममधील मंत्री आहेत. मुंबईमध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन हे उत्तर मुंबईमध्ये होत आहे. उत्तर मुंबई हा आपला गड आहे. रामभाऊ, गोपाल शेट्टी यांनी येथे उत्तम प्रकारे काम केलं आहे. आज आमच्यासाठी आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की, मोदी टीम मधील अत्यंत महत्त्वाचे खेळाडू ज्यांनी मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये एक परफॉर्मर मंत्री म्हणून आपलं नाव कमावलं. तसंच प्रत्येक क्षेत्रात पियुष गोयल यांनी आपला ठसा उमटवला आहे.

उद्धव ठाकरेंनी जागा काँग्रेसच्या माथी मारली : देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ जागेसाठी काँग्रेस आणि उबाठामध्ये पहिले तुम, पहिले तुम असं चाललं होतं. ही जागा कोणीच घ्यायला तयार नव्हतं. दोघेही एकमेकांना जागा द्यायला तयार झाले होते. शेवटी उबाठाने ही जागा काँग्रेसच्या माथी मारली आहे. आता त्यांना उमेदवार सापडत नाही आहे. उमेदवार मिळेल का नाही, अशी परिस्थिती काँग्रेसची झाली आहे. इथे महाविकास आघाडी एकही काम दाखवू शकत नाही. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सुरू झालं. यामागे मोदी यांचं व्हिजन आहे. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांचं जीवन बदलण्याचं काम मोदी यांनी केलं आहे. आम्हाला मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची आहे. काँग्रेसने गरिबी हटवणारा नारा दिला; परंतु त्यांनी गरीब हटवला गरीबी नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे.

मागील दहा वर्ष ट्रेलर पुढील पाच वर्षे पिक्चर : देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "सर्वांत महत्त्वाचं म्हणजे देशाची कमान ही मोदी यांच्या हातात गेली पाहिजे. काँग्रेस, उबाठा ज्याप्रकारे बोलतात त्याचं मला आश्चर्य वाटतं. देशाचा विकास मोदी यांनी केला आहे. त्याचप्रकारे ज्यावर चीन आणि पाकिस्तानही वाकडी नजर टाकू शकत नाही, असा मजबूत भारत तयार करण्याचं काम मोदी यांनी केलं आहे. मोदी म्हणतात, मागची १० वर्षे हा ट्रेलर होता. पुढील पाच वर्षे तुम्हाला पिक्चर बघायला मिळणार आहे. आता भारताची प्रगती कोणी थांबवू शकत नाही. मुंबईत चालणारं राज ठाकरे यांचं इंजिन होतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, या देशाचा विकास मोदीजी करू शकतात. म्हणून त्यांनी बिनशर्थ पाठिंबा मोदी यांना दिला आहे. कारण राज ठाकरे यांनी ओळखलं आहे की, देशाचा विकास हे मोदीच करू शकतात, असंही फडणवीस म्हणाले.

उत्तर मुंबईतून उबाठाने पळ काढला : याप्रसंगी बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, "उबाठा गटाच्या लोकांनी तर उत्तर मुंबई मतदार संघातून पळ काढला. सर्वत्र मोदी है तो मुमकिन है, असं सर्वेमध्ये निष्पन्न झालं. मुंबईच्या निवडणुकीची सुरुवात आजपासून होत आहे. मुंबईतील सहा पैकी सहा जागा या महायुतीच्याच येतील. मुंबईतील लोकल ट्रेनचा विकास पियुष गोयल यांनीच केला. याप्रसंगी बोलताना मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाचा विकास केला आहे. देशाला मजबूत बनवलं आहे. देशाचा आत्मविश्वास वाढवला आहे. आता दुनियेतली कुठलीही ताकद भारताला विश्वगुरू बनवण्यापासून थांबवू शकत नाही. आम्ही उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा संकल्प केला आहे."

हेही वाचा :

  1. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रात मिशन 45 पूर्ण होईल - संजय शिरसाट - Sanjay Shirsat
  2. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीची एकही जागा निवडून देऊ नका; नरेंद्र, मोदी यांचं रामटेकच्या सभेतून आवाहन - Modi Sabha In Ramtek
  3. मुंबईत एका वर्षात आढळले 4 हजार 66 क्षयरोग बाधित किशोवयीन रुग्ण; पालिकेच्या उपाययोजनांचा बोजवारा? - Tuberculosis Patient

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.