ETV Bharat / state

पराभवाची सगळी जबाबदारी माझी, मला मंत्रिमंडळातून मोकळं करा : देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय? - Devendra Fadnavis On Election Result - DEVENDRA FADNAVIS ON ELECTION RESULT

Devendra Fadnavis On Election Result : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं काम करण्यासाठी मला मंत्रिमंडळातून मोकळं करा, अशी मागणी वरिष्ठांकडं केली.

Devendra Fadnavis On Election Result
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 3:19 PM IST

Updated : Jun 5, 2024, 5:00 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Reporter)

मुंबई Devendra Fadnavis On Election Result : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये राज्यात भाजपाला मोठा धक्का बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची सगळी जबाबदारी त्यांची असल्याचं स्पष्ट केलं. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करायची आहे. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला सरकारमधून मोकळं करावं. त्यामुळे पूर्णवेळ पक्षकार्यात झोकून देऊन काम करु शकेन, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीमुळे मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

पराभवाची सगळी जबाबदारी माझी : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये भाजपाची मोठी पिछेहाट झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी "राज्यात लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये भाजापाच्या झालेल्या पराभवाची सगळी जबाबदारी माझी आहे. राज्यातील नेता म्हणून मी लोकसभा निवडणूक 2024 चं नेतृत्व करत होतो. मात्र पराभव हा पराभव असतो. त्यामुळे त्याची सगळी जबाबदारी माझी आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळातून मला मोकळं करावं : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात भाजापाला धक्का बसल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला तयारी करायची आहे. त्यामुळे मला मंत्रिमंडळातून मोकळं करावं. त्यामुळे मला पूर्णवेळ पक्षाचं काम करता येईल. याबाबत आपण वरिष्ठांकडं बोलणार आहोत. त्यामुळे वरिष्ठ यावर काय निर्णय घेतात, यावर ते अवलंबून राहील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. लोकांच्या मनात पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी; आजच्या बैठकीत सरकार स्थापनेच्या दाव्याबाबत रणनीती ठरवणार : शरद पवारांचा मोठा दावा - Sharad Pawar Press Conference
  2. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात 18 सभा घेऊनही महायुतीचे 'हे' उमेदवार पराभूत, जाणून घ्या कारण - Maharashtra Lok Sabha results
  3. 'सत्तासोपान' गाठण्याकरिता इंडिया आघाडीसह एनडीए नेत्यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, जाणून घ्या संसदेमधील पक्षनिहाय बलाबल - INDIA Bloc Vs NDA

Last Updated : Jun 5, 2024, 5:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.