ETV Bharat / state

शरद पवारांनी दाखवलेल्या नरेंद्र मोदींच्या व्हिडिओला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर, कोलांट्या उड्या शब्दावरून राजकारण तापलं - Deputy CM Devendra Fadnavis

Deputy CM Devendra Fadnavis : माढा लोकसभा मतदारसंघातल घेतलेल्या प्रचारसभेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हिडिओ दाखवून महागाई, पेट्रोल आणि गॅस दरावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. शरद पवारांचे व्हिडिओ आम्ही दाखवायला सुरुवात केली तर त्यांनी किती कोलांट्या उड्या मारल्या हे लक्षात येईल, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Deputy CM Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 10:50 PM IST

Updated : Apr 26, 2024, 9:07 AM IST

फडणीसांच्या शब्दांना प्रत्युत्तर देताना जयंत पाटील

मुंबई Deputy CM Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकां विरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते महायुतीतील प्रमुख नेत्यांवर खरपूस टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी शरद पवार यांनी आखलेल्या नवीन रणनीतीची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

नवीन खेळी का? : 2014 साली भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी इंटरनेट आणि डिजिटलायझेशन कॅम्पिंगचा वापर करून भाजपाला केंद्रात मोठं यश मिळवून दिलं होतं. अनेक जाहिरातींच्या माध्यमातून नरेंद्र मोदी देशातील घराघरात आणि लहान ते थोरांच्या मनात, बोलण्यातून दिसत होते. हाच धागा पकडत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने व्हिडिओ प्रचारात वापरून नवीन रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे. देशातील एनडीए प्रणित भाजपा सरकारला सत्तेतपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली आहे. इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार हे राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यभर सभा घेत आहेत. माढा मतदार संघातील उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 2014 साली सत्तेत आलो की पेट्रोलचे दर कमी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. बेरोजगारी हटवू आणि महागाई कमी करण्याबाबतचेही आश्वासन दिलं होते. मात्र त्यातील कोणतेही आश्वासन पूर्ण झाले नसल्याची आठवण करून देत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

आम्ही व्हिडीओ दाखवले तर- फडणवीस : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, " आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जरी गॅसचे दर वाढले तरी देशातील गॅस दर स्थिर ठेवण्याचे काम त्यांनी केलं आहे. गॅसचे भाव अस्थिर करण्याचे काम काँग्रेसनं केले होते. त्यातून दिलासा देण्याचे काम मोदींनी केले आहे. शरद पवार साहेबांचे व्हिडिओ आम्ही दाखवायला सुरुवात केली तर त्यांनी किती कोलांट्या उड्या मारल्या हे लक्षात येईल," असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला.

पक्षाचा जाहीरनाम्यातील आश्वासन कायद्याच्या चौकटीत बसवणे गरजेचं- "लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप होत आहेत. सत्तेत येण्यासाठी पक्षाच्यावतीनं जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात. मात्र सतेत आलेल्या राजकीय पक्षाकडून जाहीरनामातील आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याने आगामी निवडणुकीत विरोधक भांडवलं करीत असतात. त्यातूनच सत्ताधारी आणि विरुद्ध एकमेकांवर चिखलफेक करत असतात. त्यामुळे जाहीरनामात दिलेले आश्वासन कायद्याच्या चौकटीत आणणे गरजेचं आहे," असे मत राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केलं. "सध्याचा मतदार जागृत असल्यानं सर्वच पक्षांचा कस लागणार आहे," असेही गायकवाड यांनी सांगितलं.

जनतेला कळेल कोण कोलांट्या उड्या बहाद्दर - जयंत पाटील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, " शरद पवारांनी कधीही कोलांट्या उड्या मारल्या नाहीत. तुम्ही किती कोलांट्या उड्या मारल्या याचे व्हिडिओ आहेत. राष्ट्रवादीसोबत कधी जाणार नाही. अजित पवार यांच्या विषयी काढलेले उद्‌गाराविषयीचे सर्व व्हिडिओ जर दाखवले तर कोलांट्या उड्याबहाद्दर कोण आहे? महाराष्ट्राच्या जनतेला कळले आहे," असा टोला जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

शरद पवारांनी देशासाठी कोणतं व्हिजन दिलं- संजूभोर पाटील : "राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या साठ वर्ष राजकारणात आहेत. काँग्रेस सरकारमधील ते महत्त्वाचे नेते होते. त्यांनी कृषी मंत्री पददेखील भूषविलं आहे. शरद पवार यांनी देशासाठी कोणते व्हिजन दिले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर देशाला एक व्हिजन दिले. टप्प्याटप्प्याने ते पूर्णदेखील होत आहे. शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ दाखले तर त्याचा परिणाम मतदारावर होणार नाही," असा दावा शिंदे शिवसेनेचे प्रवक्ता संजू भोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर- मागील निवडणुकांमध्ये ठराविक पक्षाचे प्रमुख नेते आपल्या सभांमधून वृत्तपत्रांचे कात्रण दाखवत सभेला संबोधित करत सत्ताधारी पक्षावर टीका करत होते. गेल्या निवडणुकीपासून लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर असो की विरोधी उमेदवारवार निशाणा साधला जात आहे. शरद पवार यांनीदेखील तंत्रज्ञानाचा उपयोग करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना व्हिडिओ दाखवून सत्ताधारी पक्षाला कशाप्रकारे विरोधक प्रचारात टार्गेट करतील हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार, पक्षाचे प्रमुख नेते आणि मतदार यांच्यातील वैयक्तिक संपर्कासोबतच तंत्रज्ञानाचा वापरदेखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. अमरावतीला फसवणूक नको विकास पाहिजे, विरोधकांची टीका; तर खासदारांनी शेकडो कोटींचा विकास केला, सत्ताधाऱ्यांचा दावा - Amravati Lok Sabha Constituency
  2. उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांचा छगन भुजबळांना आला होता फोन; पण.... - Lok Sabha election 2024
  3. ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला काय-काय दिलं आश्वासन? - Thackeray Group Manifesto

Last Updated : Apr 26, 2024, 9:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.