ETV Bharat / state

महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर अजित पवार कडाडले, दिला 'हा' स्पष्ट इशारा

Ajit Pawar On Law And Order : राज्यात गंभीर गुन्हे घडत असतील तर कारवाई शंभर टक्के होणार. (Deputy CM Ajit Pawar) कोणी मोठ्या बापाचा नाही. राज्यात कायदाच मोठा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये आज (10 फेब्रुवारी) आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केलं. वाचा काय म्हणाले अजित पवार.

Deputy CM Ajit Pawar
अजित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 4:16 PM IST

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना अजित पवार

कोल्हापूर Ajit Pawar On Law And Order : राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे खरं आहे; मात्र कोणीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होईल. कायदा, सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आम्ही करू. (Crime in Maharashtra) कोठेही राजकीय हस्तक्षेप होत असेल तर पोलिसांनी त्याला बळी पडू नये. मुंबईतील घोसाळकर खुनी हल्ला प्रकरण, भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलंय.

विरोधकांवर बदनामीचा आरोप : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी गावकऱ्यांचे आभार मानत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोल्हापूर कामाचा चौथा दौरा असल्याचं सांगितलं. राज्यात बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांनी भाष्य करत विरोधकांवर बदनामीचा आरोप केलाय.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प : आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाय देशाला पुढे नेणारा नेता दिसत नाही. त्यांनी देशात अनेक विकास कामं केली. वंदे भारत ट्रेन सुरू केल्या. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. राज्य सरकार आपल्या विचाराचं आहे आणि केंद्रात पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. यासाठी त्यांच्या विचारांचे जास्तीत जास्त खासदार आपल्याला निवडून पाठवायचे आहेत, अशा शब्दात केंद्र सरकारची आणि मोदी सरकारची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्तुती केली. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्ह, नाव आणि झेंडा हे पुढे नेण्याचं ठरवलं असल्याचं सांगितलं.

आम्ही वचनपूर्ती करणारे लोक : अजित पवार पुढे म्हणाले की, ''सत्ता येत जात असते. सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन जन्माला आलेला नाही. दीड दोन वर्ष कोरोनामुळे आम्ही अडचणीत आलो होतो. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मला निधी द्यायचा होता; मात्र नागरिकांना वाचवणं, ऑक्सिजन प्लांट उभा करणं यासारख्या अनेक वैद्यकीय गरजेच्या वस्तूंना निधी द्यावा लागला. यानंतर काही राजकीय घडामोडी घडल्या. आम्ही वचनपूर्ती करणारे लोक आहोत. पोकळ आश्वासनं देणारी नाहीत. दुसऱ्याचं मन न दुखवता काम करण्याचा आमचा हेतू असतो. इतर कोणत्याही समाजाला त्रास न होता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीची भूमिका आहे.''

50 हजार शेतकऱ्यांच्या अकाउंटला पाठवण्याचा प्रयत्न : महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी केली. काही शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं; मात्र काही शेतकरी वंचित राहिले आहेत. चालू वर्षात पडलेल्या दुष्काळामुळं शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळं लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायच्या आत 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या अकाउंटला पाठवायचा प्रयत्न सुरू आहे. मी देखील शेतकऱ्यांच्या पोटाला जन्माला आलो आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हेही वाचा:

  1. सीबीआयनंतर समीर वानखेडे यांच्यावर ईडीची कारवाई, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल
  2. "राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का?", उद्धव ठाकरे आक्रमक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
  3. निखिल वागळे गाडी तोडफोड प्रकरण; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 'बांगड्या भरो' आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.