ETV Bharat / state

नैतिकतेच्या आधारावरच देशातील लोकशाही टिकू शकेल -प्रा. उल्हास बापट - Ulhas Bapat on Democracy

Constitutional expert Prof. Ulhas Bapat : घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी लोकशाही नैतिकतेच्या आधारावर वाचेल असं मत व्यक्त केलं आहे. ते ''भारतीय राजकारणाची 75 वर्षे किती नैतिक किती अनैतिक'' या विषयावर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटकडून आयोजित चर्चासत्रात बोलत होते.

Prof. Ulhas Bapat
घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 11:28 AM IST

पुणे : Constitutional expert Prof. Ulhas Bapat : गेल्या 75 वर्षांमध्ये 120 देशांमध्ये लोकशाहीची घसरण झाली. परंतु, भारतामध्ये मात्र आजही लोकशाही टिकून आहे. अनेक कारणांमुळे लोकशाहीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. पण हा देश लोकशाहीच्या मार्गावर टिकला तो येथील राज्यघटनेमुळे. तसंच, देशातील राज्यघटना टिकली तरच लोकशाही टिकू शकेल. असं मत घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी यांनी व्यक्त केलं आहे. ते जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

नैतिकतेच्या आधारावरच लोकशाही वाचेल : लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी नैतिक विचारांची माणसं राजकारणात येणं गरजेचं आहे. कारण नैतिकतेच्या आधारावरच देशातील लोकशाही भविष्यात टिकणार आहे, अस परखड मतही बापट यांनी व्यक्त केलं. ''भारतीय राजकारणाची 75 वर्षे किती नैतिक किती अनैतिक'' या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बापट यांनी सध्या देशात आणि राज्यभरात सुरू असलेल्या घटनांवर भाष्य केलं. वारंवार देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याबद्दल बोललं जातं. मात्र, संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना धरून नसल्याने ते शक्य नाही, असंही बापट यावेळी म्हणाले.

संविधान धोक्यात आणण्याचं काम : देशात लोकशाही टिकण्यासाठी महत्त्वाची कारणं म्हणजे राज्यघटना, पंडित नेहरू यांनी पंतप्रधान पदाच्या काळात केलेलं महत्त्वपूर्ण कार्य आणि धर्मनिरपेक्षता ही आहेत. परंतु, आज अनेक शक्ती देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आणण्याचं काम करत आहेत. या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न जर केला तर या संविधानामध्ये आणि राज्यघटनेमध्ये ते शक्य होणार नाही, असा विचारही बापट यांनी मांडला.

हेही वाचा :

1 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'रामलीला'वरुन वाद; ABVP आणि ललित कला केंद्राचे कार्यकर्ते भिडले

2 जागा वाटप ही प्राथमिकता नसून, देशात भाजपाचा पराभव हीच आमची प्राथमिकता : संजय राऊत

3 राज ठाकरे आमच्या विरोधात कधीपासून बोलायला लागले, ते 'नाशिक'ला जाऊन आले का?- जरांगे पाटलांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.