ETV Bharat / state

महाराष्ट्रातील पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी का करताहेत विलंब? पक्षांनी दिलं 'हे' कारण - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Political Parties Manifesto : काँग्रेस आणि भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे; मात्र राज्यातील प्रादेशिक पक्षांनी अद्यापही लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. तो विलंबाने जाहीर होण्यामागे नेमकं कुठलं कारण आहे, याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे. जाणून घ्या सविस्तर वृत्त.

Political Parties Manifesto
उद्धव ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 8:42 PM IST

पक्षाच्या जाहीरनाम्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे

मुंबई Political Parties Manifesto : देशातील लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणून लोकसभा निवडणूक प्रक्रियेकडे पाहिले जाते. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग तयारीत असतो. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राष्ट्रीय, प्रादेशिक किंवा राज्यातील छोट्या पक्षांना वेध लागतात ते पक्ष जाहीरनामा म्हणजेच पार्टी अजेंडा प्रसिद्ध करण्याचे. निवडणूक जिंकण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरत असतो तो जाहीरनामा. राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र राज्यातील प्रादेशिक पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला नाही. पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी विदर्भात पार पडणार आहे. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार की नाही, का होतोय विलंब यावर सध्या राज्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.

जाहीरनाम्यांना विलंब : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत असतो. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी जाहीरनाम्याचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये पक्षाची भूमिका पक्षाची वाटचाल मतदारांना, जनतेला कशाप्रकारे फायद्याचा असू शकतो याचा विश्वास घोषणा पत्राच्या माध्यमातून देत असतो. देशातील राष्ट्रीय पक्ष भाजपा आणि काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला; मात्र राज्यातील महायुतीसोबत आणि महाविकास आघाडी सोबत असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा मात्र राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुका परवा होत असून तरी देखील जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील प्रादेशिक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी इतका वेळ का घेताय अशा प्रकारचा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

संयुक्तिक वचननामा लवकरच जाहीर होणार - उद्धव ठाकरे : पक्षाच्या जाहीरनाम्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचा जाहीरनामा अर्थात संयुक्त वचननामा लवकरच जाहीर करणार आहे. देशभरासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आलेला जाहीरनामा हा सर्वसमावेशक आहे. त्या जाहीरनाम्यात काही गोष्टींचा समावेश करायचा असून त्यासह लवकरच संयुक्त वचननामा जाहीर करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध होणार - संजू भोर पाटील : भाजपाने देश पातळीवर जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांचा काही मुद्द्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे राज्य स्तरावरील काही गोष्टींचा सामावेश करणारा महायुतीचा समन्वय साधणारा असा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल, असं शिवसेना पक्षाचे नेते संजु भोर पाटील यांनी म्हटलं आहे.

जाहीरनामा प्रत्येक पक्षाने गंभीरतेने घ्यावा - हेमंत देसाई : निवडणूक जाहीरनामे महत्वाचे असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्या जाहीरनाम्यांना अनेक पक्ष गंभीरतेने घेत नसून जाहीरनाम्यातील घोषणांची अंमलबजावणी किती झाली हे देखील पक्ष लोकांना सांगत नसल्याचं वरिष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात. महाराष्ट्रातील ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीकडून आतापर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला नाही, याला कारण देखील आहे. ज्याप्रमाणे देशात भाजपा आणि काँग्रेसने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याचप्रमाणे देशात स्वतंत्रपणे एनडीए आणि इंडिया आघाडीचा एकत्रित जाहीरनामा आला नाही. महाविकास आघाडीचा जाहीरनामा विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात येणे आवश्यक आहे. प्रादेशिक स्तरावर काम करणाऱ्या पक्षांना जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचं कारणही लोकसभेची निवडणूक आहे, विधानसभेची नाही. विधानसभेच्या निवडणुकीत आपण कोणती आश्वासनं देणार हे सांगणं योग्य होईल. पण जाहीरनामे मात्र प्रत्येक पक्षाने गंभीरपणे घ्यावे. त्यांच्या अंमलबजावणीवर पक्षाने काटेकोरपणे लक्ष द्यावे असं आपल्याला वाटत असल्याचं राजकीय वरिष्ठ विश्लेषक हेमंत देसाई सांगतात.

दोन तीन दिवसात जाहीरनामा होणार प्रसिद्ध - महेश तपासे : जाहीरनाम्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ता महेश तपासे म्हणाले की, पक्षाच्या वतीने काही गोष्टींवर चर्चा सुरू आहे. या मुद्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात येईल आणि महाविकास आघाडीचा एकत्रित जाहिरानामा दोन-तीन दिवसात जाहीर केला जाईल.

पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा जाहीर करणार - आनंद परांजपे : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता आनंद परांजपे म्हणाले की, लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. या जाहीरनाम्यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश असलेला परिपूर्ण असा जाहीरनामा असणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन तो प्रसिद्ध केला जाईल, असंही ते म्हणाले.

पक्षाचा जाहीरनामा कसा असावा : निवडणूक जाहीर होताच प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असतो. थोडक्यात म्हणजेच सत्तेत आल्यानंतर पुढील पाच वर्षांत काय करणार याचा समावेश या पुस्तिकेत किंवा दस्तऐवजात समाविष्ट केलेला असतो. सत्तेत आल्यानंतर सरकार कसे चालवणार, जनतेला कसा फायदा करणार, कोणकोणत्या नवीन योजना आणणार अशा प्रकारच्या आश्वासनांचा समावेश त्यात असतो. सत्तेत आल्यानंतर पक्ष जाहीरनामा मधील किती गोष्टी पूर्ण होतात हा संशोधनाचा विषय आहे; मात्र या जाहीरनाम्याची भुरळ जनतेला पडत असते आणि त्याचा फायदा पक्ष आपल्याकडे मतदारांना खेचण्यात यश मिळवत असतो. जाहीरनामा म्हणजे पूर्वी रेवड्या वाटण्यासारख्या घोषणाचा पाऊस पडत होता; मात्र 2013 साली याबाबत सर्व पक्षांना विश्वासात घेऊन जाहीरनाम्या बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी कारण्यात आली. त्यानुसार जाहीरनाम्यात पक्षाकडून देण्यात आलेली आश्वासने कशी पूर्ण केली जाणार, त्यासाठी निधी कुठून उपलब्ध करणार याविषयी माहिती सांगावी लागणार. तसेच राज्यघटनेतील तत्त्वांचं उल्लंघन आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणार नाही, अशा प्रकारची आश्वासने टाळावी.

मविआतील घटक पक्षांच्या जाहीरनाम्याकडे लक्ष : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र राज्यातील महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपला जाहीरनामा कधी प्रसिद्ध करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीचा संयुक्त जाहिरानामा हा वचननामा म्हणून प्रसिद्ध केला जाऊ शकतो. तर तशाच प्रकारे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील घटक पक्षांचा देखील एकत्रित जाहीरनामा करण्यावर भर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात महाविकास आघाडी आणि महायुतीचा जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे. महाविकास आघाडी आपल्या जाहीरनाम्याला वचननामा तर महायुती आपल्या जाहीरनाम्याला वचनपूर्ती संबोधणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा :

  1. शिवसेनेच्या नेत्याला भाजपाची पालघरमधून उमेदवारी; भाजपाच्या लेटरहेडची काय आहे सत्यता ? - BJP Fake Letter Head
  2. शरद पवारांसोबत उत्तम जानकरांच्या भेटीनंतर गूढ वाढलं, माढा लोकसभा निवडणुकीत जानकरांचा पाठिंबा नेमका कोणाला? - Lok Sabha Election 2024
  3. लोकसभा निकालानंतर भाजपावर आकडे लावण्याची वेळ येईल, इंडिया आघाडी 300 पेक्षा जास्त जागा जिकंणार - संजय राऊत - LOK SABHA ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.