ETV Bharat / state

गौरी लंकेश हत्येत आरएसएसवर आरोप केल्याप्रकरणी मानहानीचा खटला, राहुल गांधींना न्यायालयानं ठोठावला ५०० रूपयांचा दंड - आरएसएस

Gauri Lankesh Murder: पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या 2017 साली झालेल्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं वक्तव्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. (Progressive Journalist Gauri Lankesh) यामुळे आरएसएसचे स्वयंसेवक विवेक चंपानेरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध नागरी मानहानीचा खटला दाखल केला होता. (Charges Against RSS) याप्रकरणी उत्तर दाखल करण्यास ८८१ दिवस उशीर केल्याबद्दल ठाणे न्यायालयाने राहुल गांधींना ५०० रुपयांचा दंड ठोठावला. (Thane Court)

Gauri Lankesh Murder
राहुल गांधी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 7:31 PM IST

ठाणे Gauri Lankesh Murder : पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग असल्याचा आरोप आणि आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधींना (Rahul Gandhi Fined) भोवलं. ठाणे न्यायालयात दाखल मानहानीच्या खटल्यात उत्तर देण्यास विलंब केल्या प्रकरणी ठाणे न्यायालयाने राहुल गांधींना ५०० रुपयांचा दंड ठोठावला. यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

'या' कारणाने ठोठावला दंड : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संघाचा संबंध जोडणाऱ्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याबद्दल आरएसएसचे स्वयंसेवक विवेक चंपानेरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध नागरी मानहानीचा खटला दाखल केला होता. २०१७ मध्ये ही हत्या घडविण्यात आलेली होती. या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात ठाणे न्यायालयात आरएसएसचे स्वयंसेवक विवेक चंपानेरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध नागरी मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात राहुल गांधी यांच्या माध्यमातून उत्तर दाखल करण्यास ८८१ दिवस उशीर केल्याबद्दल ठाणे न्यायालयानं राहुल गांधींना ५०० रुपयांचा दंड ठोठावला.

कर्नाटक सरकारला पाठवली होती नोटीस : सर्वोच्च न्यायालयाने पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी 29 जून, 2021 रोजी कर्नाटक सरकारला नोटीस पाठविली होती. गौरी लंकेश यांच्या बहिणीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीवरील संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे (मक्कोका) कलम काढण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला गौरी लंकेश यांच्या बहिणीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. कर्नाटक उच्च न्यायालयात आरोपीच्या जामिनाचा अर्ज प्रलंबित होता. याचिकेचा निकाल लागेपर्यंत कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपीला जामिन देऊ नये, असंही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटलं होतं.

कोण होत्या गौरी लंकेश - गौरी लंकेश कन्नडमधील ‘लंकेश पत्रिका’ साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. या वेगळ्या धाटणीच्या साप्ताहिकाची सुरुवात त्यांचे वडील पी. लंकेश यांनी १९८० मध्ये केली होती. ‘लंकेश पत्रिका’ हे व्यावसायिक साप्ताहिक नव्हते. या वृत्तपत्रातून त्या विवेकवादी विचार मांडत. दलित, महिला, सामाजिक प्रश्न या साप्ताहिकातून मांडण्यात येतात. त्याला काही कट्टर विचारवादी संघटनांचा विरोध होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा:

  1. प्रेरणादायी! कॅन्सरग्रस्त दांपत्यानं पेन्शनच्या पैशातून वीटभट्टी आदिवासी मजुरांच्या लेकरांसाठी सुरु केली वस्ती शाळा
  2. राम जन्मभूमीचा वाद कोणामुळं सुरू झाला? वादग्रस्त जागेभोवती कुंपण कोणी अन् का लावलं?; जाणून घ्या A टू Z इतिहास
  3. एकीसोबत 'संबंध' तर दुसरीसोबत लग्नाची बोलणी, भारतीय हवाई दल कर्मचाऱ्याचा कारनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.