ETV Bharat / state

...अन् मंत्री दीपक केसरकरांनी घरोघरी जाऊन मागितली भिक्षा, नेमकं कारण काय? - BHIKSHA ZOLI DEEPAK KESARKAR

फकिराच्या रूपात आपलं संपूर्ण आयुष्य व्यतित करणाऱ्या साईबाबांना वंदन करत हजारो भाविकांसह मंत्री दीपक केसरकर यांनी आज दारोदारी जाऊन भिक्षा मागितली.

Deepak Kesarkar Bhiksha Zoli
दीपक केसरकर (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2024, 1:36 PM IST

शिर्डीः फकिराच्या रूपात आपलं संपूर्ण आयुष्य व्यतित करणाऱ्या साईबाबांना वंदन करत हजारो भाविकांसह शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज दारोदारी जाऊन भिक्षा मागितली. 'भिक्षा दे गं माई' या बाबांच्या शैलीत गळ्यात झोळी घेऊन साई संस्थानाच्या अधिकाऱ्यांसह देशभरातून आलेल्या साईभक्तांनी साईबाबाच्या प्रति आपली भक्ती प्रकट केलीय. गेल्या 106 वर्षांपासूनची अखंड परंपरा आजही सुरू आहे. सबका मालिक एक, असा संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 साली दसऱ्याच्या दिवशी महासमाधी घेतली. साईबाबांची जीवनशैली अत्यंत साधी अन् सरळ होती. पाच घरी भिक्षा मागून जे मिळेल ते अगोदर पशु-पक्ष्यांना आणि भुकेलेल्यांना वाटून देत असत आणि नंतरच स्वत: ते अन्न ग्रहण करीत असत. आजही साईबाबा संस्थानाने बाबांच्या भिक्षा झोळीची परंपरा अविरतपणे सुरू ठेवलीय.

हळद-कुंकू वाहून भिक्षेकऱ्याचं स्वागत : भिक्षा झोळी आगमनाअगोदर महिला रांगोळीने रस्ता सजवतात, तर निशाणाची आरती करून हळद-कुंकू वाहून भिक्षेकऱ्याचं स्वागत केलं जातं. देशभरातून आलेले साईभक्त, ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात यात सामील होऊन दारोदार फिरून भिक्षा गोळा करतात. आपल्या दारात भिक्षा मागण्यासाठी आजही साईबाबा भिक्षेकऱ्याच्या रूपात येतात, अशी श्रद्धा ठेवून ग्रामस्थ साईच्या झोळीत भरभरून दान टाकतात. गहू, बाजरी, ज्वारी अशा विविध स्वरूपात ही भिक्षा दिली जाते. भिक्षेची देवाण-घेवाण सुरू असताना आपली ओंजळ, पदर पुढे करत साईभक्त मिळालेलं धान आपल्या घरी घेऊन जातात. खरं तर दानात मिळालेलं धान जतन केल्यास घरातील अन्न-धान्य कमी पडत नाही आणि घरात सुबत्ता राहते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. साईबाबा संस्थानाला हजारो क्विंटल धान्य भाविक दान करतात आणि हेच धान्य प्रसादभोजनासाठी वर्षभर वापरलं जातं.

गरजू रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा : साईबाबा संन्यासी जीवन जगले. मात्र त्यांच्या दरबारात रंजल्या-गांजल्यापासून ते धनिक अन् उच्च पदस्थांचा राबता असे. दानशूर दात्यांची त्यांच्या हयातीतही कमी नव्हती. गेल्या चार वर्षांत ही परंपरा कायम राहिली. या दानशूर भाविकांनी बाबांच्या झोळीत आजवर सोने, चांदी, पैसे, हिरे, मोती दान म्हणून अर्पण केलेत. बाबांनी आयुष्यभर रंजल्या-गांजल्यांची सेवा केलीय. भाविकांकडून घेऊन ते गरजवंतांना वाटले. साईसंस्थानाची वाटचाल आजही त्याच मार्गावरून सुरू आहे. गरजू रुग्णांसाठी जवळपास मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आलीय.

हेही वाचा

  1. "शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची केलेली अवस्था..."; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
  2. अभिनेते सयाजी शिंदेंनी हातात बांधलं घड्याळ; 'स्टार प्रचारक' म्हणून नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.