मुंबई Dahi Handi Festival 2024 : मुंबईत आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. इथं अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. दरवर्षीप्रमाणं यंदाही दादरमध्ये महिला दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. दादरच्या आयडियल बुक डेपो इथं या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. याच बुक डेपोच्या दहीहंडीची ओळख सेलिब्रिटी दहीहंडी अशी देखील आहे. इथं मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी गर्दी केली. त्याचबरोबर सुविधा इथली दहीहंडी, मनसेची दहीहंडी या दादर परिसरातील दहीहंडी आकर्षणाचा विषय असतात. आज सकाळपासूनच तिथं गोविंदा पथकांनी हंडीला सलामी देण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.
मुंबईत आज दहीहंडी सणाचा उत्साह : मुंबईत आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. इथं अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाही दादरमध्ये महिला दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. दादरच्या आयडियल बुक डेपो इथं या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. याच बुक डेपोच्या दहीहंडीची ओळख सेलिब्रिटी दहीहंडी अशी देखील आहे. इथं मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची गर्दी असते. त्याचबरोबर सुविधा इथली दहीहंडी, मनसेची दहीहंडी या दादर परिसरातील दहीहंडी आकर्षणाचा विषय असतात. आज सकाळपासूनच तिथं गोविंदा पथकांनी हंडीला सलामी देण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळते आहे. अशातच दादरच्या प्रतिष्ठित आयडियल दहीहंडीच्या इथं चार थर लावून चौथ्या थरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारण्यात आला.
दहीहंडीत शिवकालीन इतिहास देखावा : शिवशाही गोविंद पथकानं दरवर्षीप्रमाणं यावर्षी देखील शिवकालीन इतिहास देखावा मानवी मनोरे रचून सादर करण्याची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी या गोविंदा पथकानं छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्याच्या विजयाचा देखावा साकारला. विशेष म्हणजे हा देखावा मानवी मनोऱ्यावर दाखवण्यात आला. तीन थर लावण्यात आले, तिसऱ्या थरावरील गोविंदांनी आपल्या डोक्यावर फळी ठेवली. त्याच्यावरती शिवकालीन वेशभूषा केलेल्या गोविंदांनी हा देखावा साकारला. शिवशाही गोविंदा पथक दरवर्षी दहीहंडीच्या माध्यमातून आपला इतिहास लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मागील वर्षी याच गोविंदा पथकानं चौथ्या थरावर अफजलखानाच्या वधाचा देखावा साकारला होता. मानवी मनोऱ्यावर या गोविंदा पथकाकडून देखावा साकारला जात असल्यानं दरवर्षी दादरकरांसाठी हे गोविंदा पथक आकर्षणाचा विषय असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचा साकारला देखावा : राज्यात सध्या महिला सुरक्षेचा विषय चर्चेत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज महिला अत्याचाराच्या बातम्या येतात. यावर देखील या गोविंदा पथकानं देखावा सादर केला. रांझ्याचे पाटील यांच्या सुनेचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच महाराष्ट्रात आज महिलांवर होणारे अत्याचार हा विषय घेऊन या गोविंदा पथकानं महिला सुरक्षाबाबत देखील एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा :