मुंबई Mumbai Airport Crime News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 10 कोटी 60 लाख रुपयांचे सोने, हिरे आणि परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. 20 मार्च ते 22 मार्च दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या कारवाईत 5.36 कोटीचे परकीय चलन, 3.75 कोटीचे हिरे आणि 1.49 कोटी मूल्याचे 2.59 किलो सोने, अशा एकूण 8 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 10 कोटी 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माहितीच्या आधारे करण्यात आली कारवाई : 20 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्गमन क्षेत्रात परकीय चलन आणि हिऱ्यांच्या तस्करीबाबत विमानतळ आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन-III च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. संशयितांपैकी एकजण मुंबईहून बँकॉकला जात होता आणि त्यानुसार अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या निर्गमन क्षेत्रात सावधगिरी बाळगली. यावेळी संशयितासह प्रवास करणाऱ्या अन्य एका प्रवाशाची तपासणी करण्यात आली असता, त्यांच्याकडं 5.36 कोटी किंमतीचे परकीय चलन (USD, UK पाउंड, युरो आणि NZ डॉलर्स असलेले) आढळले.
तिघांना अटक : त्यानंतर संशयाच्या आधारावर, त्याच फ्लाइटमधील अन्य एका प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता, एका ट्राउजरच्या खिशात 3.75 कोटीचे हिरे लपवून ठेवलेले आढळले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दोन दिवसांमध्ये अनेक कारवाया : एमिरेट्स फ्लाइट EK 500 द्वारे दुबई ते मुंबई प्रवास करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये रोखण्यात आले आणि 24 कॅरेट सोन्याचे दागिने (17 नग ) एकत्रितपणे 1589.00 ग्रॅम वजनाचे दागिने प्रवाशाच्या शरीरावर लपवून ठेवलेले आणि परिधान केलेले सापडले. इंडिगो फ्लाइट 6E 62 द्वारे जेद्दाह ते मुंबई असा प्रवास करत असलेल्या एका भारतीय नागरिकाला विशिष्ट इंटेलच्या आधारे रोखण्यात आले आणि 24 कॅरेट 255.00 ग्रॅम वजनाचे गोल्ड कट पीसी बार (7 नग) ओटीपोटात लपवून ठेवलेले आढळले.
तसंच विस्तारा फ्लाइट UK 234 द्वारे मस्कत ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अडवण्यात आले आणि प्रवाशाच्या शरीरावर 267.00 ग्रॅम एकूण वजनाचे 21 कॅरेट सोन्याचे दागिने लपवून ठेवलेले आढळले. जजीरा फ्लाइट J9 401 द्वारे कुवेत ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला रोखण्यात आले आणि 24 कॅरेट 250 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने प्रवाशानं परिधान केलेल्या कपड्यांमध्ये लपवलेले आढळले. विस्तारा फ्लाइट UK 202 द्वारे दुबई ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली असून या प्रवाशाच्या शरीरावर 231.00 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोन्याचे दागिने लपवून ठेवलेले आढळले होते.
हेही वाचा -