अमरावती Dr Ambedkar Jayanti Amaravati : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महामानवाच्या या जयंती सोहळ्यात निळ्या रंगासह राजकीय रंगाची उधळण देखील पाहायला मिळाली. यावेळी खासदार नवनीत राणांनीही कार्यक्रमात हजेरी लावली.
रात्री बारा वाजल्यापासून रंगला सोहळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इर्विन चौक येथे मध्यरात्री बारा वाजतापासून बाबासाहेबांच्या हजारो अनुयायांनी गर्दी केली. रात्री बाराच्या ठोक्यावर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. रात्रीच महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांच्या जोरदार घोषणा दिल्या. यानंतर सव्वाबारा वाजता भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. निळी शॉल पांघरून नवनीत राणा यांनी बाबासाहेबांचा जयघोष केला. यावेळी त्यांच्यासमोर गर्दीतून "वारे पंजा, आयरे पंजा" अशा घोषणा देण्यात आल्या.
सकाळीही राजकीय नेत्यांची उसळली गर्दी : सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची गर्दी इर्विन चौक येथे उसळली. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार वाहून अभिवादन केले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी राणे हे भूमाफिया असून त्यांच्याकडे लँड बँक आहे तर आमच्या उमेदवाराकडे ब्रेन बँक आहे. जिल्ह्यात विकास हवा यासाठी काँग्रेसच्या उमेदवारालाच सर्वांनी साथ द्यावी, असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी यावेळी केलं.
नवनीत राणांच्या हस्ते भाजी-पोळी वाटप : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इर्विन चौक येथे मोठी जत्रा भरली. या ठिकाणी येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना नवनीत राणा यांच्या हस्ते पोळी भाजीचे वितरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लागलेल्या मोठ्या रांगेत स्वतः नवनीत राणा यांनी फिरून बाबासाहेबांच्या अनुयायांची भेट घेऊन विचारपूस केली.
नवनीत राणांच्या हस्ते भाजी पोळी वाटप : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इर्विन चौक येथे मोठी जत्रा भरली. या ठिकाणी येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना नवनीत राणा यांच्या हस्ते पोळी भाजीचे वितरण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लागलेल्या मोठ्या रांगेत स्वतः नवनीत राणा यांनी फिरून बाबासाहेबांच्या अनुयायांची भेट घेऊन विचारपूस केली.
हेही वाचा :
- सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan
- पंतप्रधानांच्या हस्ते भाजपाचं 'संकल्प पत्र' जाहीर; 'या' दोन मोठ्या घोषणांसह अनेक आश्वासनं - BJP Manifesto
- घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सलमान खानला फोन कॉल, सुरक्षेबाबत दिली मोठी माहिती - Salman Khan