मुंबई Atul Londhe On Budget 2024 : मोदी सरकार त्यांच्या शब्दावर जागलं आहे का? यावरून काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे सर्वसमावेशक विचार करूनच हा अर्थसंकल्प मांडला गेल्याचं भाजपानं सांगितलं आहे.
मोदींच्या आश्वासनाची पूर्तता कधीच झाली नाही : या बजेट बद्दल बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत की, काँग्रेसच्या जाहीरनाम्याची कॉपी मोदींपासून अजित पवारांपर्यंत सर्वच करत आहेत; परंतु त्यासाठी जी नीतिमत्ता लागते ती या महायुती सरकारमध्ये आहे का? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली; परंतु त्यांच्या खात्यामध्ये खरोखर तुम्ही पैसे टाकणार का? जनतेला मोफत सिलेंडरचं आमिष तुम्ही दाखवलं; परंतु सिलेंडरचे भाव गगनाला भिडले त्याचं काय? शेतकऱ्यांसाठी सरसकट दोन लाख कर्जमाफी करणार होता, ते तुम्ही करू शकला नाही. पण केंद्रात आम्ही केलं होतं, असं मत अतुल लोंढे यांनी मांडलं.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला: काँग्रेसने जे जे आश्वासन दिलं किंवा राहुल गांधींनी जे जे सांगितलं त्याची पूर्तता काँग्रेसनं केली आहे; मात्र नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधीच झाली नाही. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. दरडोई उत्पन्न कमी झालेलं आहे. राजस्थानमध्ये २५ लाखाची चिरंजीवी आरोग्य योजना हे भाजपाचं सरकार आल्यानंतर बंद पाडली. २०१२ च्या जनगणने प्रमाणे हे सुरू आहे. पण २०२१ ची जनगणना आल्यानंतर काय परिस्थिती होईल हासुद्धा मोठा प्रश्न आहे, असंही अतुल लोंढे म्हणाले.
जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही : या बजेट बद्दल बोलताना भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर म्हणाले आहेत की, भाजपाने कधीही संधीसाधू राजकारण केलेलं नाही आणि ते करणारही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरूनच महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आज महायुतीने सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, युवा, वारकरी, महिला तसेच समाजातील सर्व घटकांचा विचार करून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त अर्धा टक्क्यांनी जास्त मतं घेऊन होरपळून गेलेल्या महाविकास आघाडीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असंही अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
हेही वाचा:
- दरवाढीसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, संगमनेरात रस्तारोको आंदोलन; शालेय विद्यर्थ्यांचाही आंदोलनात सहभाग - Farmers Agitation
- श्री संत तुकाराम महाराजांच्या टाळावरून टाळगाव चिखली गावाची ओळख, हजारो भाविक येतात दर्शनाला - Talgaon Chikhli History
- थापा आणि निवडणूक जुमल्यांचा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची सरकारवर सडकून टीका - Opposition on Maharashtra Budget