मुंबई Congress Protest PM Visit Palghar : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 ऑगस्ट) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मात्र, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींच्या या दौऱ्याला काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी निषेध आंदोलन करणार असल्याचं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत असून काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय. तसंच वर्षा गायकवाड यांनाही स्थानबद्ध करण्यात आलंय.
जनतेची माफी मागा : मालवण येथील राजकोट किल्ल्यामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. तो पुतळा जमीनदोस्त झालाय. देशाच्या पंतप्रधानांनी आठ महिन्यापूर्वी पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आल्यावर आम्ही त्यांना सांगणार आहोत की, आपण शिवप्रेमी आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेची जाहीरपणे माफी मागावी. या पुतळ्याच्या कामात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालाय, असा आमचा आरोप आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही तुमचा त्या ठिकाणी येऊन निषेध करतो, असं वर्षा गायकवाड म्हणाल्यात.
पोलिसांकडून नोटीस : महाविकास आघाडी वांद्रे येथे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्यामुळं वांद्रे पोलिसांनी वर्षा गायकवाड यांना नोटीस पाठवली आहे. सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला मोर्चे किंवा आंदोलन करता येणार नाही, असं उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. फक्त मुंबईतीत आझाद मैदानातच मोर्चा आणि आंदोलन करू शकता. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं नोटीसात म्हटलं आहे. या कारणामुळं निदर्शनं करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
वर्षा गायकवाड यांना आम्ही अटक केलेली नसून आम्ही आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्याचं आवाहन केलंय. अगोदर त्यांना कायद्यानुसार एक नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तरीही त्या आंदोलनावर ठाम होत्या. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कला पोलिसांच्या गाडीत जाण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना शिवाजी पार्क येथे पाठवत आहोत.- हेमराज राजपूत, पोलीस उपायुक्त
हेही वाचा -
- पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज वाढवण बंदराचं भूमिपूजन; 2 लाख तरुणांना मिळणार रोजगार, मच्छीमारांचा विरोध कायम - Pm Modi Maharashtra Visit
- शिवाजी महाराज पुतळा प्रकरण : स्ट्रक्चरल डिझायनर चेतन पाटीलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Police Detain Chetan Patil
- "शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी"; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue