नांदेड Jitesh Antapurkar resignation : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज शुक्रवारी सायंकाळी मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी - काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आणि आमदारकीचा दिला राजीनामा दिला आहे. त्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनानं देगलूर बिलोलीच्या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकरांना काँग्रेस पक्षानं संधी दिली. मतदार संघात देखील सहानुभूतीची प्रचंड लाट होती. दुसरीकडे शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले सुभाष साबणे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश करून पोट निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करून आव्हान निर्माण केलं. भाजपाकडून सुभाष साबणे यांना मैदानात उतरलो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी घेतली अंतापूरकर यांचा प्रचार करून ही प्रतिष्ठेची केली. त्यामुळे विजयी झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर जितेश अंतापूरकर देखील भाजपामध्ये जातील अशी चर्चा होती. त्यातच आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. आज दुपारीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
क्रॉस व्होटिंग प्रकरण - विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग प्रकरणात जिथे अंतापूरकर यांचं नाव आलं. याचं कुठलंही खंडन न करता जितेश अंतापूरकर यांनी आपली बाजू मांडली नाही. त्यातच नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत देखील जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला नाही. जितेश अंतापूरकर हे काँग्रेसमध्येच राहतील अशी चर्चा असताना आज सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा..