ETV Bharat / state

मतदारांनी वाजवली 'पिपाणी', अनेक ठिकाणी 'तुतारी'ला फटका - Lok Sabha Election Results 2024

Lok Sabha Election Results 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं होतं. मात्र, याच चिन्हासारखे पिपाणी चिन्ह अन्य एका उमेदवाराला दिल्यानं साताऱ्यात शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

Lok Sabha Election Results 2024
शरद पवार (ETV BHARAT Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 9:14 PM IST

मुंबई Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या पाहायला मिळाल्या. एखाद्या मातब्बर उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी त्याच नावाचा दुसरा उमेदवार उभा करत अनेकांनी गुगली टाकलीय. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे तसंच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात मुख्य लढत होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी 32 हजार मतांनी शिंदे यांचा पराभव केला. सुरुवातीला मतमोजणीत 14 फेऱ्यांपर्यंत शशिकांत शिंदे 19 हजार मतांनी आघाडीवर होते. मात्र सातारा, कराड दक्षिण, कोरेगाव या तीन विधानसभा मतदारसंघांमधून उदयनराजे भोसले यांना चांगली आघाडी मिळाली. त्यामुळं त्यांनी शिंदे यांना 32 हजार 770 मतांनी दारूण पराभव केला. शिंदे यांना वाई, पाटण, कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघातून चांगलं मतदान झालं होतं.

पिपाणीनं घेतली 37 हजार मतं : शशिकांत शिंदे यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस ही होती. मात्र, याच मतदारसंघात संजय गाडे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना निवडणूक आयोगानं पिपाणी निवडणूक चिन्ह दिलं होतं. पिपाणी आणि तुतारी या दोन निवडणूक चिन्हांमध्ये साम्य असल्यानं मतदारांचा गोंधळ झाला. मतदारांची चिन्ह ओळखण्यात चूक झाल्यामुळं संजय गाडे यांना 37 हजार 62 इतकी मते मिळाली. वास्तविक ही मते शशिकांत शिंदे यांच्या पारड्यात पडली, असती तर त्यांचा किमान 5 हजार मतांनी विजय निश्चित झाला असता, असं तपासे यांनी सांगितलं.

बजरंग सोनवणेंचा थोडक्यात विजय : याच पद्धतीनं बीड लोकसभा मतदारसंघातही बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या लढतीत चिन्हाच्या गोंधळामुळं बजरंग सोनावणे यांना खूप मोठा फटका बसल्याचं दिसून आलं. या मतदारसंघातही अशोक थोरात या बहुजन महा पार्टीच्या उमेदवाराला पिपाणी चिन्ह देण्यात आलं होतं. त्यामुळं थोरात यांना 54 हजार 850 मते मिळाली आहेत. मात्र, बजरंग सोनावणे यांना अधिकची साडेसहा हजार मते मिळाली नसती, तर त्यांनाही पराभव पत्करावा लागला असता.

आयोगानं दखल घेतली नाही : या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला यापूर्वीच पत्राद्वारे विनंती केली होती. तुतारीशी साधर्म्य असलेली निवडणूक चिन्ह अन्य पक्षाला देण्यात येऊ नयेत. तसं झाल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन ते चुकीच्या उमेदवाराला मतदान करतील, मात्र निवडणूक आयोगानं आमच्या विनंतीची दखल न घेतल्यानं आमच्या एका उमेदवाराला नाहक पराभव पत्करावा लागला, असंही ते म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. महाराष्ट्रातील दोन नेते दिल्लीत घडवणार भूकंप? विनोद तावडेंनी घेतली अमित शाह यांची भेट, देवेंद्र फडणवीसांची संध्याकाळी बैठक - Vinod Tawde meets Amit Shah
  2. अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्यानं काँग्रेससह शिंदेंच्या शिवसेनेची विधानसभेला बार्गेनिंग पॉवर वाढेल? - Maharashtra Assembly Election 2024
  3. अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्यानं काँग्रेससह शिंदेंच्या शिवसेनेची विधानसभेला बार्गेनिंग पॉवर वाढेल? - Maharashtra Assembly Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.