ETV Bharat / state

अमरावतीच्या धावपटूंचा दक्षिण आफ्रिकेत विक्रम ; सलग ११ तासात धावत जिंकली 'कॉम्रेड मॅरेथॉन' - Comrade Marathon - COMRADE MARATHON

Comrades Marathon दक्षिण ऑफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत अमरावती येथील सहा धावपटू सहभागी झाले होते. धावपटूंना ९० किलोमीटर अंतर १२ तासांमध्ये सहा टप्प्यात पार करावं लागतं. यात अमरावतीच्या दिलीप पाटील यांनी सलग आठ वेळा सहभाग नोंदवला.

Comrades Marathon At South Africa
कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी धावपटू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 2:55 PM IST

अमरावतीच्या धावपटूंचा दक्षिण आफ्रिकेत विक्रम (ETVBHARAT Reporter)

अमरावती Comrades Marathon: अमरावती येथील दिलीप पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे पार पडलेल्या 'कॉम्रेड मॅरेथॉन' स्पर्धेत तब्बल आठ वेळा पार केल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी 'कॉम्रेड मॅरेथॉन' स्पर्धा डर्बन येथे ९ जुन रोजी पार पडली. स्पर्धेसाठी देशभरातून हजारो स्पर्धकांसोबत अमरावती जिल्ह्यातील सहा धावपटूंनी सलग ११ तास धावत ९० किलोमिटरचे अंतर पार केलं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंखे-बद्रे, पोलीस निरिक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलीस कर्मचारी राजेश कोचे, पोलीस निरीक्षक सतिश उमरे यांनी अमरावतीचा झेंडा सातासमुद्रापार गाडला.

१२ तासात ९० किलोमीटर अंतर: दक्षिण अफ्रिकेतील डर्बन आणि पीटर मरीडसबर्ग या दोन शहरादरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात येते. सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात. पदक जिंकण्यासाठी ९० किलोमीटर अंतर १२ तासांत पूर्ण करण्याचं टार्गेट असतं. यावर्षी संपूर्ण भारतामधून ३२३ धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी सहा धावपटू अमरावतीचे आहेत. २०२३ मध्ये या स्पर्धेत अमरावती येथील दिलीप पाटील आणि दीपमाला साळुंखे- बद्रे असे दोन जण सहभागी झाले होते. परंतू यावर्षी पहिल्यांदाच अमरावती सारख्या लहान शहरांमधून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी सहा जण सहभागी झाले होते.

अशी असते कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा?

कॉम्रेड मॅरेथॉन ही ९० किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन आणि पीटर मरीडसबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेत ९० किलोमीटर अंतर सहा टप्प्यांमध्ये पार करावं लागतं. ते सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात. ९० किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण करणाऱ्यांनाच पदक दिलं जातं.

हेही वाचा

  1. पाकिस्तान संघासाठी 'करो या मरो' ची स्थिती; कॅनडाशी आज भिडणार, कोण मारणार बाजी ? - T20 World Cup 2024
  2. ''घाणेरडं तोंड उघडण्यापूर्वी...''; अकमलच्या वादग्रस्त विधानावर हरभजन सिंगनं दिलं जोरदार प्रत्युत्तर - T20 World Cup 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.