मुंबई : CM forging signatures : मुख्यमंत्री कार्यालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी दिलीय.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात IPC 420, 465, 468, 471 आणि 473 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय - वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे
बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी : मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदनं आणि पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन (ई ऑफिस प्रणाली) संबंधित प्रशासकीय विभागांना पत्र पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद तसंच बनावट असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली आहे. तातडीनं पोलिसांकडं तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
सतर्कपणे काम करण्याच्या सूचना : मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसह शेरे असलेली निवेदने आणि पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद आणि बनावट असल्याचं कर्मचाऱ्यांना निदर्शनास आलं. त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीनं पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी देखील अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. दुसरीकडं मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्याच्या प्रकारानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
हेही वाचा :
1 जामतारा येथे रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी
3 निलेश राणे यांच्या हॉटेलला महापालिकेनं ठोकलं टाळं, तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत