ETV Bharat / state

'लाडकी बहीण' योजनेच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची आघाडी? भाजपा म्हणते... - Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या या योजनेचा शिंदे गटाला फायदा होईल असं चित्र असताना भाजपानं मात्र यात फारसं तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना शिवसेना (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 7:05 PM IST

मुंबई Ladki Bahin Yojana : राज्य सरकारनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राबवण्याचा निर्णय घेतला. महायुती सरकारच्या वतीनं जरी हा निर्णय घेतला गेला असला तरी शिवसेनेच्या वतीनं राज्यभर या योजनेचा आक्रमक प्रचार करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या या योजनेचा शिंदे गटाला फायदा होईल असं चित्र असताना भाजपानं मात्र यात फारसं तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेना आणि भाजपाचे नेते (ETV Bharat Reporter)

अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवनवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश धुऊन काढण्यासाठी आणि समाजातील सर्व स्तरांमध्ये पोहोचण्यासाठी सरकारनं तरुण, वृद्ध आणि महिलांसाठी नवनवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सरकारची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी असणाऱ्या पात्रता आणि अटी यांची माहिती सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेसाठी खेड्यापाड्यात अर्ज भरण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय आणि सेतू सुविधा केंद्र गर्दी केल्याचं चित्र आहे. महिलांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून शिवसेनेनं या योजनेचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्री पाठीराखा भाऊ प्रतिमा : दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री हे सर्वसामान्य जनतेचे कैवारी असून राज्यातील महिला भगिनींचे पाठीराखे आहे अशी प्रतिमा या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं सुरु केला आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे म्हणाल्या, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि राज्यातील सर्व महिलांना न्याय देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिला भगिनींपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिन्याला पंधराशे रुपये सर्व पात्र महिलांना देण्यात येतील. त्यासाठी महिलांनीही अत्यंत चांगल्या प्रतिसाद दिला असून नारीशक्ती ॲपद्वारे महिला ऑनलाईन अर्ज दाखल करत आहेत." तसंच आतापर्यंत राज्यातील 70 लाख महिलांनी नारी शक्ती ॲपद्वारे अर्ज डाऊनलोड करून घेतले आहेत, तर 36 लाख 83 हजार महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. दररोज सुमारे दोन लाख 58 हजार महिला अर्ज दाखल करीत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर अधिक व्हावा आणि महिलांना हे अर्ज डाऊनलोड करता यावेत यासाठी मुंबईत परळ येथील केईएम रुग्णालयाजवळ शिवसेनेच्या वतीनं फलक लावण्यात आले असून त्यावर क्यू आर कोड सुद्धा देण्यात आला आहे. या क्यू आर कोडच्या माध्यमातून महिलांना आपले अर्ज डाऊनलोड करता येतील त्यासाठी त्यांना कुठंही संगणकावर अथवा ऑफलाइन गर्दी करण्याची गरज नाही. महिलांना जास्तीत जास्त सुलभपणे हे अर्ज प्राप्त होतील आणि पात्र महिलांना ते भरता येतील यासाठी शिवसेनेच्या वतीनं आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही वाघमारे यांनी सांगितलं.

योजना सरकारची, महायुतीला फायदा : दरम्यान यासंदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही योजना जरी मुख्यमंत्र्यांच्या नावे असली तरी ती राज्य सरकारनं सुरु केलेली योजना आहे. महायुतीतील घटक पक्षांचा यात निश्चितच सहभाग आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेबाबत नुकतंच बारामती इथं मेळावाही घेतला. त्याचप्रमाणे आपापल्या स्तरावर महायुतीतील सर्व पक्ष या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळं केवळ शिवसेनेलाच नव्हे तर महायुतीलाच या योजनेचा निश्चितच फायदा होणार आहे." महिलांच्या घरात दरमहा पंधराशे म्हणजे एका वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत. महिलांपर्यंत या योजना जाव्यात, यासाठी आम्ही ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करुन देत आहोत. तसंच तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे नारीशक्ती ॲप असेल किंवा क्यूआर कोड असेल या माध्यमातूनही आता महिलांपर्यंत ही योजना कशी जाईल याचा प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. 'लाडक्या बहिणी'साठी अजित पवारांची मोठी घोषणा; यंदाच्या रक्षाबंधनला भेटणार मोठी ओवाळणी - Mazi Ladki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.